सावंतवाडी : शहरातील सर्वोदय नगर शिक्षक कॉलनी येथे होळी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. रात्री होळी मातेची विधिवत पूजा करून नागरिकांतर्फे श्रीफळ अर्पण करण्यात आले. त्यानंतर होळीचे दहन करण्यात आले. प्रारंभी ज्येष्ठ नागरिक विजयकुमार मुरगूड आणि सिद्धेश नेरुरकर यांनी पूजा करून होळी मातेला गाऱ्हाणे घातले.
त्यानंतर सर्व नागरिकांनी पूजा करून होळी पेटविली. याप्रसंगी संभाजी तथा भाई नाईक, गजानन नाईक, रमेश भोसले, सौ. वैशाली भोसले, स्नेहा रेडकर, सतीश नाईक, सौ. माधुरी नाईक, सौ. रोशनी गावडे, रघुनाथ गवस, गणपती काळकुंद्रीकर, धनंजय राऊळ, तानाजी पालव, उमेश काळकुंद्रीकर, सौ. दिशा कामत, गुरुदत्त कामत, सौ. कविता नाईक नेरुरकर, सौ. पूनम नाईक, निनाद नाईक, सौ. बारदेशकर, अतुल पाटील, प्रदीप शिरसाट, सौ. छाया पालव, सौ. अनुश्री राणे, सौ. स्मिता नाईक, सौ. सुजाता पाटील, अमित नाईक, रुद्राक्ष भोसले आणि छोटी मुले उपस्थित होती. होळी पेटविल्यानंतर प्रसादाने सांगता केली. सौ. दिशा कामत यांनी उत्सव नियोजनाबद्दल धन्यवाद दिले.