सावंतवाडी : संजू परब सारखा गुणी कार्यकर्ता लाभला हे आमचे भाग्य आहे. संजूने भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांची एकत्र मोट बांधून जी संघटनात्मक बांधणी केली आहे ती त्याला आगामी काळात नक्कीच फलदायी ठरेल. नगराध्यक्ष म्हणून त्याने अल्पावधीत केलेले काम हे वाखाणण्याजोगे आहे. दोन वर्षात त्याने सावंतवाडी शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकला. अनेक बंद प्रकल्प मार्गी लावले. त्याने आपले हे कार्य असेच सुरू ठेवावे भविष्यातही त्याला नक्कीच यश मिळेल, अशा शब्दात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी संजू परब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा सावंतवाडी नगर परिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून औक्षण तसेच रक्षाबंधन तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून संजू परब यांना वाढदिवस अभीष्टचिंतन करण्यात आले.
”असाच लोभ ठेवा, असंच प्रेम राहू द्या, तुम्ही केलेल्या शुभेच्छा बद्दल मी तुमचा सदैव ऋणी राहील”, अशा शब्दांत संजू परब यांनी मान्यवरांचे व चाहत्यांचे आभार मानले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, तालुका मंडल अध्यक्ष महेश धुरी, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, जि.प.चे माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, प्रितेश राऊळ,अंकुश जाधव, माजी सभापती प्रमोद सावंत, पंकज पेडणेकर, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, सैनिक पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, गुरुनाथ सावंत, मंदार नार्वेकर, शेखर गांवकर, चंद्रकांत जाधव, सचिन साटेलकर, परीक्षित मांजरेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, सह्याद्री फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच संजू परब मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
‘वक्त से पहिले व नशीब से ज्यादा किसी को कुछ नही मिलता ‘ अशी जरी म्हण असली तरीही संजू परब यांच्या बाबतीत मात्र त्यांनी नशिबापेक्षा कर्तुत्वाला अधिक महत्व दिले आहे. जे आपल्या प्राक्तनात आहे ते नक्कीच मिळणार मात्र आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करीत राहायला हवं. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नक्कीच यश मिळतं, अशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी संजूला शुभेच्छा दिल्या.
तर नशिबात जे लिहिलंय ते कोणीच बदलू शकत नाही. संजू नगराध्यक्ष होईल हे देखील अनेकांना पटत नव्हतं मात्र त्याच्या नशिबात ते होतं. त्यापेक्षा त्याच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे व वरिष्ठांनी त्याला दिलेल्या साथीमुळे ते शक्य झालं. आपल्याला मिळालेल्या संधीचा त्याने देखील पुरेपूर सोनं करून दाखवलं. निष्ठा प्रामाणिकपणा हे महत्त्वाचं असून आपल्याला काय मिळेल या अपेक्षेने काम करण्यापेक्षा संघटनेसाठी आपण जास्तीत जास्त देत राहावं संघटना नक्कीच विचार करते. संजूला देखील नक्कीच यश मिळेल अशा शब्दात राजन तेली यांनी शुभेच्छा दिल्या.
संजू हा नेहमीच कर्णासारखा दानशूर राहिला आहे. जे जे आपल्याकडे आहे ते देण्यापासून तो कधीही दूर राहिला नाही. अडल्या नडल्यांना मदत करणे हे कर्तव्य मानून तो आजवर कार्यरत राहिला आहे. ग्रामीण भागातून येऊन सावंतवाडी शहरातील नागरिकांची मन जिंकून व प्रस्थापितांशी संघर्ष करून त्याने शहराचं नेतृत्व केलं. मात्र, त्याने केवळ शहरापुरते मर्यादित न राहता जिल्ह्यातही मोठं काम केलं आहे. आगामी निवडणूक फार महत्त्वाची असून या निवडणुकीत कोण अर्जुनाच्या भूमिकेत असेल ते केवळ कृष्णालाच माहिती आहे. त्यामुळे प्रत्यक्षात लढाईची वेळ येईल त्यावेळी आम्ही सर्व संजूच्या नक्कीच पाठीशी ठामपणे उभे राहू, अशा मार्मिक शब्दात जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी संजूला शुभेच्छा दिल्या.
तर जिल्हा बँक संचालक तसा भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी देखील संजूला शुभेच्छा देताना मागील काही आठवणींना उजळा दिला. संजूचा व माझा राजकीय संघर्ष झाला तो आपल्या पक्षाचं काम करत होता व मी माझ्या. दोघेही आपापला पक्ष वाढविण्यासाठी कार्यरत होतो. मात्र आम्ही कधीही वैयक्तिक पातळीवर राजकारण केले नाही.
आज सुदैवाने आम्ही एकाच पक्षात आहोत. संजूच्या मनात काही इच्छा आहेत त्यामुळे ज्यावेळी वेळ येईल तेव्हा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, अशा शब्दात महेश सारंग यांनी शुभेच्छा दिल्या.
संजू हा माझा सर्वात लाडका मित्र आहे. आपले हट्ट तो आवर्जून आमच्यापाशी मांडतो.चांगला नगराध्यक्ष कसा असावा हे संजूने आपल्या कार्यकर्तृत्वाने दाखवून दिले.त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक प्रकल्प मार्गी लावले सावंतवाडी शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकला. भविष्यातही त्याला अनेक संधी उपलब्ध होतील त्याचे देखील तो नक्कीच सोन करेल यासाठी शुभेच्छा अशा शब्दात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
तर सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी आपल्या प्रास्ताविकात संजू परब यांच्या एकूणच कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकला. मडुरा गावासारख्या ग्रामीण भागातून सावंतवाडी शहरात आलेल्या संजू परब यांनी समाजकारण व राजकारणाच्या माध्यमातून येथील जनतेची वेळोवेळी सेवा केली आहे. मित्र कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे संजू परब. राजकारणापलीकडे जी दोस्ती असते ती संजूने नेहमीच जपली आहे. सह्याद्री फाउंडेशन च्या माध्यमातून गेला महिनाभर संजू च्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत. आपल्या राजकारणाचा उपयोग सर्वसामान्य जनतेला व्हावा हीच त्याची इच्छा असते व भविष्यातही त्याच्या मनातील सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील, अशा शब्दात त्यांनी संजू परब यांचे अभीष्टचिंतन केले.
यावेळी जिल्हा परिषदचे माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, चंद्रकांत जाधव, प्रताप परब, अंतोन रोंड्रिक्स व अन्य पदाधिकाऱ्यांनी ही संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे आपल्या सुंदर व मनमोहक शैलीत प्रा. रुपेश पाटील यांनी केलेले निवेदन कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर घेऊन गेले.
यावेळी मडूरा सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच बाळू गावडे, ग्राम पंचायत सदस्या रेश्मा परब, माजी सरपंच सोनल परब, सोसायटी चेअरमन ज्ञानेश परब, माजी चेअरमन संतोष परब, संचालक लाडू परब, दिनेश नाईक, प्रवीण नाईक, सोमनाथ परब, भगवान परब, पिंटो परब, सुनील परब, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच निलेश कुडव, ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते उत्तम परब, इन्सुलिन सरपंच तात्या वेंगुर्लेकर, माजी सभापती मानसी धुरी, महेश धुरी, सत्यवान बांदेकर यांच्यासह यावेळी भारतीय जनता पार्टीचे तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यांनी संजू परब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.