सावंतवाडी : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी शालेय शिक्षण मंत्री व आमदार दीपक केसरकर पुन्हा एकदा शिवसेनेचे प्रमुख प्रवक्ते म्हणून पक्षाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडणार आहेत. तशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिल्या आहेत. गुढीपाडव्यानंतर आपण ही भूमिका मांडू, अशी माहिती पत्रकार परिषदेत आम. दीपक केसरकर यांनी दिली.
महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतर नाट्यानंतर श्री. केसरकर यांनी शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून ठळकपणे बाजू मांडली होती. त्यानंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर केसरकर गेले काही दिवस शांत होते. मात्र सद्य:स्थिती लक्षात घेता राज्यात पक्षासह नेत्याची बाजू मांडण्यासाठी पुन्हा एकदा दीपक केसरकर यांना प्रवक्ते म्हणून काम करा, अशा सूचना दिल्या आहेत.
याबाबतची माहिती श्री. केसरकर यांनी दिली. ते पुढे म्हणाले, पक्षाने अपक्ष प्रमुखांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मी गुढीपाडव्याच्या नंतर पुन्हा एकदा पक्ष प्रवक्ता म्हणून बाजू मांडणार आहे.



