कणकवली : दिनांक 26/3/2025रोजी 8.30 ते 9 या वेळेत वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय तळेरे येथे रस्ता सुरक्षा अभियान, सायबर गुन्हे, अंमली पदार्थचे सेवन न करणे या अनुषंगाने पोलीस बांधवांकडून विद्यार्थ्यांना यथायोग्य मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच अपघात ठिकाणी जखमीला धीर देणे तसेच लवकरात लवकर उपचार कसा मिळेल? याची माहिती देण्यात आली. डायल 112 बद्दल जंजागृती करण्यात आली. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल आशीष जाधव हजर होते. सोबत श्री. मोहिते, आणि श्री वावरे आदि उपस्थित होते.
ADVT –