शिरोडा येथे ३१ मार्चला ‘मालवणी साहित्य संमेलन’ रंगणार.! ; साहित्य प्रेरणा कट्ट्याचे आयोजन.

वेंगुर्ले : साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या सलग ५३ व्या मासिक कार्यक्रमाचे औचित्य साधून शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने ३१ मार्चला दुपारी ३.३० ते रात्री ८ या कालावधीत ‘मालवणी साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे.

शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या कै. मच्छिंद्र कांबळी सभागृहात होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मालवणी बोलीभाषेचे अभ्यासक सतीश लळीत हे असतील. या संमेलनामध्ये दुपारी ३.३० ते ४ नोंदणी, दुपारी ४ ते ५ या वेळेत संमेलनाचे उद्घाटन, संध्या. ५ ते ६ या वेळेत मालवणी साहित्यात काय असावे, काय नसावे? या विषयावर परिसंवाद असणार असून यामध्ये भाऊसाहेब गोसावी (अध्यक्ष) व सौ. कल्पना मलये, सौ. तनुजा तांबे आदी सहभागी होणार आहेत.
संध्याकाळी ६.१५ ते ६.३० या वेळेत ‘कै. जयवंत दळवी यांचा मालवणीनामा’ हा कार्यक्रम, संध्या, ६.३० ते ७.३० कविसंमेलन होणार आहे. यामध्ये अध्यक्षा डॉ. सई लळीत सहभागी होणार आहेत. आणि त्यानंतर संमेलनाचा समारोप असणार आहे. संमेलनाच्या अधिक माहितीसाठी ९४०३०८८८०२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन साहित्य प्रेरणा कट्टा, आजगावचे समन्वयक व साहित्यिक विनय सौदागर आणि र. ग. खटखटे ग्रंथालय, शिरोडाचे कार्यवाह सचिन गावडे यांनी केले आहे.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles