सावंतवाडी : नारळी पौर्णिमेला अर्पण करण्यात येणारा मानाचा नारळ आज ऐतिहासिक मोती तलावात अर्पण करण्यात येणार आहे. शहरात घडलेल्या दुःखद घटनेमुळे सोमवारी या नारळाचे पूजन करण्यात आले होते. आज सायंकाळी साडेचार वाजता विधीवत पद्धतीने हा सुवर्ण नारळ तलावात अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांनी दिली.
सोमवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक राजवाडा येथे मानाच्या नारळाचे युवराज लखमराजे भोंसले व पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले होते. आज सायंकाळी साडेचार वाजता हा नारळ विधीवत पद्धतीने तलावात अर्पण करण्यात येणार आहे. याप्रसंगी शहरवासियांना उपस्थित रहाण्याचे आवाहन युवराज लखमराजे भोंसले यांनी केले आहे.