- श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्या आदेशानुसार मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश सुसविरकर व ठाणे जिल्हाध्यक्ष अमोल बांबुळकर यांनी घेतली मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव नितीन दळवी यांची भेट.
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगार यांच्या वार्षिक रीनिवल साठी लागणाऱ्या ग्रामसेवक दाखल्यावर ग्रामसेवक सही व शिक्का देत नाहीत. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन कामगार वर्गावर होणारा अन्याय दूर करावा यासाठी पत्र दिले होते परंतु आजमिती पर्यंत कोणताही निर्णय देण्यात आला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 12 हजार पेक्षा वर कामगार नोंदणी आहे. सर्व कामगार ग्रामसेवक यांच्या आठमुठे पद्धतीमुळे सर्व योजना पासून मुकलेले आहेत. शासन योजना देते परंतु ग्रामसेवक संघटनेमुळे सही देत नाही त्यामुळे कामगार यांचा रोष मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.
सदर विषयची तात्काळ दखल घेण्यासाठी श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश खाडे, कामगार विभाग चे प्रधान सचिव विनिता सिंगल मॅडम, तसेच बांधकाम कामगार सचिव विवेक कुंभार यांना मंत्रालय पातळीवर निवेदन देऊन लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली आहे.
मंत्रालय मधील मुख्यमंत्री कार्यालय सचिव नितीन दळवी व कामगार विभागचे सहसचिव थेटे साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून घटना सांगितली चर्चा अंती या आठवड्यात कॅबिनेट बैठक आहे त्यावेळी आपणास कळविण्यात येईल व सदर विषयी सविस्तर चर्चा करण्यात येईल असे आश्र्वासित केले.
तरी कामगार वर्गाच्या हितासाठी सदर निर्णय न झाल्यास कायदेशीर व सनदशीर मार्गाने 29-08-2024 रोजी कामगार ठिय्या आंदोलन करणार आहेत.