माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत जिल्हास्तरीय भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन !

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार, भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत जिल्हास्तरीय खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सावंतवाडीत सह्याद्री फाऊंडेशनच्या सहकार्याने होणारी ही स्पर्धा पुरुषांसाठी असून येत्या ६ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर ही स्पर्धा रंगणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपा आंबोली मंडल अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी तसेच सह्यादी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाला १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकाच्या स्पर्धकाला ७ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकाला ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धावपटूंना सात किलोमीटरचे अंतर पूर्ण करायचे आहे.

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी मो.नं. ७३८५५७११११, आंबोली मंडल अध्यक्ष रवी मडगांवकर ९४२२३९२८४७, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे ९४२०२६०६६७, माजी नगरसेवक आनंद नेवगी ९४२२६३३३५७, माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर ९४२३९१८११८ व सह्याद्री फाऊंडेशनचे दीपक राऊळ ९४२३३०४३१८ यांच्याशी संपर्क साधावा.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र आणि टी-शर्टचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles