काजूच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह.!

दोडामार्ग : दिनांक १ एप्रिल २०२५, मंगळवार रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग तालुक्यातील विर्डी गावात सोशल मीडियावरील एका ग्रुपवर काजू बागेत मृतदेह असल्याचा एक मेसेज पडला आणि गावात कुजबुज सुरु झाली. जो तो सदरचा मृतदेह कोणाचा?, कशामुळे त्याचा जीव गेला? ‘घातपात कि आत्महत्या?’ याबाबत तर्क वितर्क लावू लागले. अखेर दोडामार्ग पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह दोडामार्ग रुग्णालयात आणण्यात आला.

घटनास्थळचा पंचनामा आणि तिथल्या लोकांकडून माहिती घेतली असता सदरचा मृतदेह विर्डी येथील विद्देश लाडू गवस (वय ४५) या युवकाचा असल्याचे समजले. दोन दिवसांपूर्वी कामावर जातो असे सांगून तो घराबाहेर पडला होता. तो मात्र झाडावर लटकलेल्या वेदनादायी अवस्थेत मिळाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मयत विद्देश यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने दोडामार्ग तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles