नवी दिल्ली : मार्च महिन्यामध्ये 1.96 लाख कोटी रुपयांची जीएसटी संकलन झाले आहे. एखाद्या महिन्यात झालेले हे सर्वात मोठे दुसरे कर संकलन आहे. देशांतर्गत कर संकलन 8.8 टक्क्यांनी वाढून 1.49 लाख कोटी रुपये झाले आहे. तर आयात क्षेत्रातून झालेले जीएसटी संकलन 13.56 टक्क्यांनी वाढून 46,919 कोटी रुपये इतके झाले आहे.
सेंट्रल जीएसटी कलेक्शन 18,145 कोटी रू., राज्य जीएसटी संकलन 49,891 कोटी तर संयुक्त जीएसटी कलेक्शन 95 853 कोटी रुपये इतके झाले आहे. अधिभार संकलन 12,253 कोटी इतके आहे. मार्च महिन्यामध्ये 19,615 कोटी रुपयांचा परतावा दिला असून गेल्या वर्षाच्या मार्च महिन्याच्या तुलनेत यात 41 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे मार्च महिन्यात झालेले निव्वळ जीएसटी संकलन 1.76 लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षाच्या मार्च महिन्याच्या तुलनेत यामध्ये 7.3% वाढ झाली आहे.