प्रा. रूपेश पाटील – सावंतवाडी ….
आता फक्त एकचं वादा.,
हक्काचा आमदार हवा राम दादा..!
नमस्कार मंडळी,
मित्रहो, मराठी भाषेतील एक थोर व समर्थ लेखक आचार्य अत्रे यांचे एक वाक्य आहे, दगडा धोंड्याच्या या देशात पिके पिकत नसली किंवा रत्ने सापडत नसली तरी,
युगान युगे येथे नररत्ने सापडतात, म्हणूनच या प्रांताला ‘महाराष्ट्र’ शिवाय दुसरे नाव शोभून दिसत नाही.!
ह्याचं मराठी मातीतीलचं नव्हे तर समस्त हिंदुस्थानातील, सर्वोच्च नर रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज..!,
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतील, उत्तर महाराष्ट्र अर्थात खान्देशातील धुळे शहराजवळ असलेल्या पुण्यभूमी नगाव या गावात एका महान रत्नाचा जन्म झाला..
त्यांचं नाव आहे स्व. माजी आमदार अण्णासाहेब द. वा. पाटील.
आणि अण्णासाहेबांचा दमदार वसा आणि वारसा घेऊन, जनकल्याणाच्या विकासाचा ध्यास ठेवून सज्ज झाले आहेत ते युवकांच्या मनातील आयडॉल…
अर्थातच रामदादा भदाणे – पाटील..!
पुण्यभूमी नगांव व पंचक्रोशीचे भाग्य विधाते,
सर्वसामान्य गोरगरीबांचे कैवारी,
नगांव पुण्यभूमीचा इतिहास व भूगोल बदलून टाकणारे अजातशत्रू,
अस्सल खांदेशी ढाण्या वाघ,
हृदयस्त अण्णासाहेब द. वा. पाटील यांच्याकडून आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय बाळकडू घेऊन,
राजकीय कारकिर्दीला पैलू पाडणारे आणि
अल्पावधतचं धुळे जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपली छाप पाडणारे,
एक तरुण, तडफदार आणि पुण्यभूमी नगाव गावाचा आणि धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाचा हसतमुख चेहरा आणि नव चेतना जागृत करणारा असेचा किरण…
सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यांतील विकासाच्या स्वप्नांचा निखळता तारा,
भदाणे खानदानाचा अस्सलं हिरा,
नगांव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा
जिल्हा परिषद नगाव गटाचे अभ्यासू सदस्य,
तरुणाईच्या हृदयातील आणि माता-भगिनींच्या मनातील,
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आवडते युवा नेतृत्व,
आदरणीय राघवेंद्र उर्फ रामदादा मनोहरजी भदाणे-पाटील..!
आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी आपला आपला वाढदिवस…!
प्रथमतः आपणाला वाढदिवसाच्या हृदयपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा.!
प्रिय राम दादा..
“झेप अशी घ्या की, पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळही पाहत रहावा,
कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून,
यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिकाधिक विस्तारीत होत जावो,
तुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढील आयुष्य सुख, समृद्धी, निरामय आणि ऐश्वर्य संपन्न होवो, हीच सदिच्छा..!
वाढदिवसाच्या हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
स्नेह तर कायमचं, वृद्धीची अभिलाषा..!”
👑👑👑👑👑👑👑👑
एक कुशल संघटक, मुत्सद्दी, धोरणी, अमोघ वक्तृत्व, आणि संभाषण चातुर्य लाभलेले, कालानुरूप सुसंगत उपक्रम राबविणारा उपक्रमशील, कलासक्त, लोकसंपर्काची आवड असलेले, लोकविलक्षण, अष्टपैलू गुणांचा समुच्चय म्हणजे आदरणीय रामदादा भदाणे.
आदरणीय रामदादा… आपण राजकीय वारसा मार्गदर्शन , अनुभव आणि प्रेरणा म्हणून जपला आणि स्वीकारला. पण सार्वजनिक जीवनात वाटचाल करताना मात्र स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष ते जिल्हा परिषद सदस्य पासून ते भाजपा धुळे ग्रामीण विधानसभा निवडणुक प्रमुख पदापर्यंत काम करताना धुळे ग्रामीण मतदारसंघात स्वतःची ओळख ही कामातून निर्माण केली आहे.
‘राम दादा’- हे फक्त नाव नाही,
हे वादळ आहे विकास कामांचं,
हे वादळ आहे जनमानसांच्या भावी स्वप्नांना साकार करण्याचं.,
‘रामदादा..!
हे फक्त नाव नाही, हा वारसा आहे, सातत्यपूर्ण संघर्षाचा,
हा वसा आहे, लोकाभिमुख विकास कामांचा.,
जनमानसांसोबतच पशुधनाचाही विकास व्हावा, या दूरदृष्टीकोनाचा.!
सन्माननीय रामदादा…!
आजच्या मंगलमय दिवसाचा क्रांतीसूर्य आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येत राहो…
तसेच तथागत बुद्धांची प्रज्ञा, शिल व करुणा,
तुकोबांची वैचारिकता,
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची यशोगाथा ,
शंभूराजेंच्या बलिदानी व त्यागाची महती,
महात्मा फुलेंची सत्यशोधकता ,
राजर्षी शाहूंची सामाजिक जागृतता ,
विश्वभूषण डॉ. बाबासाहेबांची विद्वत्ता,
लोकशाहीर आण्णाभाऊंची कलासंपदा…
ह्या आपल्या भावी आयुष्यात प्रतीपदेच्या चंद्रकलेप्रमाणे समान वाढत राहो हेच वाढदिवसाचे खरे अभिष्टचिंतन ..!
Happy Bday Dear RAMDADA…!
-शुभेच्छुक-
रुपेश पाटील सर
नगाव,
(ह. मु. सावंतवाडी.)
✍🏻✍🏻✍🏻
◆|वा|ढ|दि|व|स|अ|भी|ष्ट|चिं|त|न|◆
♠️…ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा… !!♠️
🎂🎂🌹🌹🌹🎂