Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

महेश राऊळ यांना ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार २०२५’ प्रदान.

संजय पिळणकर.

वेंगुर्ला : मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दिला जाणारा ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार – २०२५’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ळस गावचे सुपुत्र महेश राऊळ यांना कोल्हापूर येथे एका भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी देशभरातून आलेल्या ३,००० हून अधिक प्रस्तावांमधून महेश राऊळ यांची निवड करण्यात आली होती.त्यांचे रक्तमित्र संघटक म्हणून योगदान, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्य,सर्पमित्र व प्राणीमित्र म्हणून भूमिका तसेच पर्यावरण जनजागृतीसाठी केलेल्या कार्याची दखल म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा.आ.सतेज उर्फ बंटी डी.पाटील आणि मा.प्रा.जयंत आसगावकर उपस्थित होते.या मान्यवरांच्या हस्ते महेश राऊळ यांना गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या राष्ट्रीय सन्मानामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक बळ मिळणार आहे.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles