तळवडे विद्यालयाच्या नूतन नामफलकाचा अनावरण समारंभ संपन्न !

सावंतवाडी : शाळेला आई मानून तिच्याविषयीचे प्रेम, जिव्हाळा, आत्मियता नेहमी आपल्या कृतीतून व्यक्त करणाऱ्या तुमच्यासारख्या माजी विद्यार्थ्यांमुळेच शाळेची दिवसेंदिवस उन्नती होत आहे. विशाल होडावडेकर यांच्यासारखे विद्यार्थी आपल्या दातृत्वाद्वारे शाळेच्या प्रगतीला हातभार लावतात, तेव्हा तुम्हा विद्यार्थ्यांविषयी सार्थ अभिमान वाटतो. असे प्रतिपादन श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडेचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांनी केले.

श्री. देसाई हे तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या नामफलकाच्या अनावरण प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने बोलत होते.

विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा कुडाळ, वेंगुर्ले व वैभववाडी इत्यादी नगरपालिकेचा कार्यभार असलेले नगर अभियंता विशाल होडावडेकर यांनी स्वदेणगीतून विद्यालयाला नाम फलक व फलकाचे छप्पर तयार करून दिले. या फलकाचे अनावरण विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती विदुल पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून झाले.

यावेळी मुख्याध्यापक प्रतापराव देसाई. माजी मुख्याध्यापिका श्रीमती विदुल पाटकर, निवृत्त शिक्षिका सौ. रंजना सावंत, ज्येष्ठ शिक्षिका सौ. मीरा नाईक, सौ मिलन देसाई, शिक्षक किशोर नांदिवडेकर, अजित मसुरकर, दिलराज गावडे, प्रवीण गोडकर, प्रयोगशाळा सहाय्यक नंदकिशोर बुगडे, परिचर सिताराम कोळेकर, लिपिक आनंद मौर्ये, निवृत्त लिपिक रामा मसुरकर, चतुर्थश्रेणी कर्मचारी सत्यवान परब, केशव परब तसेच माजी विद्यार्थी विशाल होडावडेकर, दिनेश माजगावकर, तृप्ती तिरोडकर नारायण नाईक, सागर सावळ तसेच सन २००४- २००५ सालातील दहावीच्या वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles