सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात सिद्धी जौहरच्या रूपाने आलेलं वादळ आपल्या पोलादी छातीने घोडखिंडीत रोखून धरणारे आणि महाराजांना सहिसलामत विशाळगडावर पोहोचेपर्यंत साथ देणारे वीर बाजीप्रभू देशपांडे.! वीर बाजीप्रभू यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावन झाली. या स्मृतिप्रित्यर्थ ‘शिव संस्कार’तर्फे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
वेशभूषा स्पर्धा पहिला गट –
1.प्रथम क्रमांक – सुयश पाटील -कोल्हापूर
2.द्वितीय -स्पृहा दळवी, दोडामार्ग
3.तृतीय -आराध्य राजे -बेळगाव
4.उत्तेजनार्थ -अनिषा परब, म्हापसा, गोवा
वक्तृत्व स्पर्धा –
1प्रथम -चिन्मयी बागवे -सावंतवाडी
2.द्वितीय – जान्हवी सावंत, ठाणे
3.तृतीय -सर्वज्ञ् वराडकर, बांदा
4.उत्तेजनार्थ – साई देसाई, हडपसर, पुणे.
खुला गट –
1.प्रथम – श्री रोशन यादव, सातारा
2.द्वितीय – श्री सौरभ जोशी, सांगली
3.तृतीय – सौ. रीना निलेश मोरजकर, बांदा.
सर्व विजेत्या स्पर्धेकांचे शिवसंस्कार तर्फे हार्दिक अभिनंद न! तसेच सहभागी सर्व स्पर्धेकांचेही हार्दिक अभिनंदन!
अतिशय कमी वेळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेचा विषय मांडण्यामध्ये विजेते स्पर्धक यशस्वी झालेले असल्याची शिवसंस्कारच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आणि हे निश्चितच कौतुकास्पद आहे.याचबरोबर या ऐतिहासिक स्पर्धाना उदंड प्रतिसाद मिळत असल्याने महाराष्ट्राच्या इतिहासाचा जागर यशस्वीरित्या त्यातून होत आहे तसेच शिव संस्कारांचे जतन व शिव विचारांचे मंथन हा हेतूही साध्य होत असल्याचे समाधान संस्थेने व्यक्त केले.
सर्व विजेत्यां स्पर्धकाना शिवसंस्कार च्या वार्षिक सन्मान सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. सदर सन्मान सोहळा ऑक्टोबर 2024 मध्ये सम्पन्न होणार असून लवकरच तारीख जाहीर केली जाणार आहे.
जाहिरात –