कणकवली : उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर, कन्हैया पारकर, समीर पारकर यांच्या मातोश्री उषा भास्कर पारकर यांचे रविवारी वृद्धापकाळाने रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. कुडाळ एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष व यशस्वी उद्योजक मोहन होडावडेकर, सचिव ॲड. नकुल पार्सेकर, ज्येष्ठ सल्लागार व यशस्वी उद्योजक आनंद बांदिवडेकर यांनी पारकर कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी संदेश पारकर, कन्हैया पारकर व समस्त पारकर कुटुंबीय उपस्थित होते.



