‘बायना का आयना’ २४ मे रोजी सावंतवाडीत ! ; डाॅ. रुपेश पाटकर यांच्या ‘अर्ज मधील दिवस’ या पुस्तकावर आधारित नाटक.

सावंतवाडी :  वेश्या व्यवसायाच्या वास्तवावर प्रकाशझोत टाकणारे दोन अंकी मराठी नाटक ‘बायना का आयना’ २४ मे रोजी सावंतवाडीत तर २५ मे रोजी कुडाळ येथे आयोजित करण्यात आले आहे.
सिमेन्स सांस्कृतिक संस्थेने या नाटकाची निर्मिती केलेली असून नाटकाचे संहिता लेखन व दिग्दर्शन महेश सावंत पटेल यांनी केले आहे. या नाट्याच्या संहितेला राज्यस्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.


सिंधुदुर्गातील जेष्ठ मनोविकारतज्ज्ञ डाॅ. रुपेश पाटकर यांच्या ‘अर्ज मधील दिवस’ या पुस्तकावर हे नाटक आधारित आहे. गोव्यातील बायना या एकेकाळच्या रेडलाईट वस्तीत मनोविकारतज्ज्ञ म्हणून काम करताना आलेले अनुभव डाॅ.पाटकर यांनी सदर पुस्तकात अधोरेखित केले आहेत.
वेश्याव्यवसायबाबत असलेल्या गैरसमजांना हे नाटक दूर करत प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायला लावते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles