संजय पिळणकर
सावंतवाडी : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सावंतवाडी कार्यकारणी सदस्य, सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार निलेश मोरजकर यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्त २३ वे रक्तदान केले. निलेश मोरजकर यांनी आजवर रक्तदानासह रक्तदान शिबिरांचेही यशस्वी आयोजन केले आहे, लग्नाचा वाढदिवस,स्वतःचा वाढदिवस तसेच इतर सांस्कृतीक कार्यक्रमानिमित्त रक्तदान शिबिरांचे ते आयोजन करत असतात, प्रतिष्ठानच्या वतिने रुग्णांना रक्तदाते पुरवठा करण्यातही ते नेहमी पुढे असतात.
त्यांचे या २३ व्या रक्तदानाबद्दल अभिनंदन व वाढदिवसाच्या आरोग्य संपन्न दीर्घायुष्याच्या सदिच्छा !