Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

मालवणात ५ जून रोजी अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे लोकार्पण.

मालवण : जिल्हा वार्षिक योजना अग्निशमन सेवाबळकटी अंतर्गत सुमारे दोन कोटी मंजूर निधीतून उभारणी करण्यात आलेल्या मालवण नगरपरिषद अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारतीचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते ५ जून रोजी संपन्न होणार आहे. याबाबत माहिती माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी दिली आहे.

मालवण नगरपरिषद परिसरात अग्निशमन कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम करणे फेज १ (विंग ए) या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. तळमजल्यावर सुसज्ज अग्निशमन वाहन पार्किंग सुविधा, तळमजला उर्वरित भाग अग्नीशमन केंद्र कार्यालय, स्टोअर रूम आणि नियंत्रण कक्ष, पहिला मजला वेटिंग रूम, रेस्ट रूम आणि ऑफिस. तर दुसरा मजला दोन प्रशस्त टू बीएचके रूम (अधिकारी निवासस्थान) असे इमारतीचे स्वरूप आहे. या इमारतीचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शुक्रवार ५ जून रोजी संपन्न होणार आहे, अशी माहिती दीपक पाटकर यांनी दिली आहे.

ADVT –

खुशखबर ! – आता इंजिनिअरिंग व फार्मसी शिक्षणाची चिंता सोडा ! ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक कॅम्पस भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे येथे प्रवेश घ्या आणि उत्तम करिअर घडवा !

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles