सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संदीप एकनाथ गावडे व समस्त भाजपा परिवार यांच्या वतीने उद्या दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल पटांगणावर सुंदर वाडी दहीहंडी उत्सव २०२४ मोठ्या जल्लोषी वातावरणात साजरा केला जाणार आहे.
या उत्सवात सांस्कृतिक दहीहंडीचा थरार, ढोल पथक ऑर्केस्ट्रा, डीजे, तसेच सिने कलावंतांची उपस्थिती असणार आहे. तरी सुंदरवाडी दहीहंडी उत्सवात सहभागी होऊन आपल्या संस्कृतीला जोपासण्यासाठी एकत्र होऊया, आणि भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा एक महोत्सव साजरा करूया असे आवाहन युवा नेते संदीप गावडे व तमाम भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.