मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह मनसे कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. येत्या १४ जून रोजी वाढदिवसाच्या दिवशी मनसैनिकांना शिवतीर्थावर भेटू शकणार नाही, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. तर वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे हे कुटुंबासोबत मुंबईबाहेर जाणार आहे. तर १४ जून रोजी मनसैनिकांनी लोकोपयोगी कार्यक्रम राबवावे, असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केले आहे.
‘येत्या १४ जून २०२५ ला म्हणजे अर्थातच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपली भेट होणं शक्य नाही, कारण या दिवशी मी सहकुटुंब मुंबई बाहेर जात आहे. तुमच्या आणि किंवा इतरांच्या मनात हा प्रश्न येईल की मी वाढदिवस साजरा का करणार नाहीये ? काही विशेष कारण आहे का ? पण मनापासून सांगतोय की असं कोणतंच कारण नाहीये. त्यामुळे येत्या १४ जूनला तुम्हाला भेटता येणार नाही, याचे कोणतेही अर्थ काढू नका.’, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.