Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

भाई देऊलकर, महेश राऊळ, परमेश्वर सावळे यांचा देहदानाचा संकल्प. ; सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेचा पुढाकार.

संजय पिळणकर.

सावंतवाडी :
सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेचा पुढाका
सावंतवाडी : आरोंदा गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वासुदेव उर्फ भाई देऊलकर यांनी आपल्या ७६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत देहदानाचा निर्णय घेतला आहे.सिंधूरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही संघटना रक्तदान, अवयवदान व देहदान हे महान कार्य अविरतपणे करत असून त्यासाठी समाजात सतत जनजागृती करत असते.तसेच जिल्ह्यात त्याबाबत जनजागृतीसाठी कार्यशाळांचे आयोजन करत असते.भाई देऊलकर यांच्या वडिलांची देहदानाची इच्छा होती,ती तत्कालीन परिस्थितीत पूर्ण होऊ शकली नाही, मात्र ती प्रेरणा भाईंमध्ये होती, प्रतिष्ठानच्या माध्यमातून ती पूर्णत्वास आली.यातूनच प्रेरणा घेऊन भाई देऊलकर यांनी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने तसा फॉर्म भरून आज आपला निर्णय सावंतवाडी येथील शासकीय विश्रामगृह येथील आयोजीत कार्यक्रमात सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेचे सस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, संजू परब,मुलगा व पत्रकार शामसुंदर वासुदेव देऊलकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर केला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ,सैनिक स्कुल आंबोलीचे सहाय्यक शिक्षक परमेश्वर सावळे यांनीही देहदानाचा निर्णय जाहीर करून तसा फॉर्म भरला.
यावेळी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सुनील राऊळ,जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ,सावंतवाडी – दोडामार्ग विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर,वेंगुर्ला उपाध्यक्ष सौ.समृद्धी संजय पिळणकर, सल्लागार सुधीर पराडकर,सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर,माजी निवृत्त केंद्रप्रमुख श्रीम.सरिता सुरेश मुननकर,ज्येष्ठ पत्रकार उत्तम वाडकर,अभिमन्यू लोंढे,सैनिक स्कुल आंबोलीचे सहाय्यक शिक्षक परमेश्वर सावळे, दीनानाथ बांदेकर,प्रल्हाद तावडे, प्रताप परब आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles