Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

वेंगुर्ला येथील विश्व हिंदू परिषद आयोजित नेत्र चिकित्सा शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद.! ; १५० नेत्र रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ, नेत्र रुग्णांची होणार मुंबईत मोफत शस्त्रक्रिया, शुभांगी ऑप्टीक्सचे निलेश हरमलकर व सचिन हरमलकर यांचे सहकार्य.

वेंगुर्ला : विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने वेंगुर्लेत भटवाडी येथील डॉ. राजन शिरसाठ यांच्या निवासस्थानी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुंबई स्थीत डाॅक्टर निरव दिलीप रायचुरा व डाॅक्टर दृष्टी निरव रायचुरा यांनी नेत्र रुग्णांची तपासणी केली , तसेच या तपासणीत ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे अशा रुग्णांवर मुंबईत मोफत शस्त्रक्रिया करणार असल्याचे या शिबीराचे आयोजक डाॅ. राजन शिरसाठ यांनी सांगितले.

शिबिराचे उद्घाटन नवी मुंबईचे सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , वि.हि.प.चे जिल्हा सेवा प्रमुख नंदकुमार आरोलकर, सुनील नांदोसकर , वि.हि.प.चे नितीन पटेल , डाॅक्टर माधुरी शिरसाठ , भाजप वैद्यकीय आघाडीचे डाॅ.दर्शेश पेठे , किरात चे मराठे, शुभांगी ऑप्टीक्सचे निलेश हरमलकर व सचिन हरमलकर, रवींद्र शिरसाठ इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत पारकर यांनी केले व आभार प्रदर्शन डाॅ. राजन शिरसाठ यांनी केले. यावेळी नगरसेवक प्रशांत आपटे , वि.ह.प.चे गिरीश फाटक , शिरसाठ मिठाईचे बाळा शिरसाठ , गो – सेवा आयोगाचे दीपक भगत , किर्तीमंगल भगत , रा.स्व.संघाचे नित्यानंद आठलेकर , विशाल सावळ , उद्योजक दिपक माडकर , शिवदत्त सावंत इत्यादी मान्यवरांनी शिबिरास भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

ADVT – 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles