Wednesday, May 21, 2025

Buy now

spot_img

‘ठाकरे’ यांची खरी लायकी महाराष्ट्राला कळली, ‘आदित्य’सारखा घाबरट मी बघितला नाही. – माजी खासदार निलेश राणे यांचे ‘ट्विटरवॉर’.

मालवण : काल मालवण येथील राजकोट येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधी पक्षनेते यांच्यासह उबाठाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र यानंतर तेथे ठाकरे व राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला होता. या घटनेबद्दल निलेश राणे यांनी सकाळी ट्विट केले.

माजी खासदार निलेश राणे म्हणतात की, ठाकरे यांची खरी लायकी महाराष्ट्राला कळली. एक ठाकरे, एक आमदार, एक विरोधी पक्ष नेता, एक माजी खासदार असून सुद्धा हतबल झाले. अडीच तास त्यांना लपून बसावं लागलं. उबाठा कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांसमोर मार खाल्ला. मैदान सोडून एका बाजूने सटकाव लागलं, हा ट्रेलर होता अर्धा तास अजून थांबला असता तर पुरा पिक्चर दाखवला असता, आदित्यसारखा घाबरट मी बघितला नाही, असा हल्लाबोल आपल्या ट्विटरवरून माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles