शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील ! : शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब. ; सावंतवाडी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ च्या शिक्षकांचे केले कौतुक.

सावंतवाडी : शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे आज शाळेचा पहिला नंबर आला. त्यामुळे मी सर्व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो. असे गौरवोद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज येथे काढले. येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ चा ‘पीएमसी’ मधून बेस्ट शाळा म्हणून पहिला क्रमांक जिल्ह्यात आल्याबद्दल आज संजू परब यांनी शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन तसेच मुलांना खाऊ वाटप करून अभिनंदन केले.

यावेळी श्री. परब पुढे म्हणाले शाळेला जी काही मदत लागेल ती आपण निश्चितच करू. शिक्षकांनी आपल्याला शाळेबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. तसेच शाळेच्या बाहेरील संरक्षण भिंत देखील धोक्यात आहे, ती देखील कुठल्या माध्यमातून निधी देता येईल का?, त्यासाठी आपण प्रयत्न करू. अन्यथा तसे न झाल्यास आपण स्वखर्चाने ती भिंत बांधून देऊ, असे आश्वासन देखील उपस्थित शिक्षकांना दिले.

यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उमेश परब, सरपंच प्रचिती कुबल, मुख्याध्यापिका पेडणेकर मॅडम, कुंभार मॅडम, बाळू वाळके, राजू कुबल, क्लॅट्स फर्नांडीस आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles