दोडामार्ग: भारतीय जनता पार्टी आणि भाजपा युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून माटणे जिल्हा परिषद मतदार संघातील शाळेंसह, भेडशी येथील न्यू इंग्लिश स्कूल व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा नेते संदीप गावडे आणि दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संदीप गावडे म्हणाले, गेली अनेक वर्ष हा उपक्रम सावंतवाडी तालुक्यातील विविध शाळांमध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत राबवत होतो आजपासून ह्या उपक्रमाची मर्यादा वाढवून असून प्रतिवर्षी भारतीय जनता पार्टी म्हणून पुढे दरवर्षी हा उपक्रम असाच सुरूच राहील. तसेच येथील विविध शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा आम्हा सर्वांचा नेहमीच प्रयत्न राहील. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना सहकार्य म्हणून हे शैक्षणिक साहित्य आम्ही दिले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या संधीचा उपयोग करून आपली शैक्षणिक उन्नती वाढवावी आणि आपल्या प्रशालेचे आणि गावाचे नाव उज्वल करावे.
यावेळी शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीने संदीप गावडे आणि भाजप पक्षाचे आभार मानताना संदिप गावडे आणि भाजप पक्षाने वह्या वाटपाचा स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय त्याला आमच्याकडून शुभेच्छा आणि विद्यार्थी परिवाराकडून आपले आभार आपल्या कडून भविष्यातही असेच कार्य घडो या शुभेच्छा दिल्या.
ADVT –