Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

विशाल परबांचं कामच लई भारी.!, आरवलीवासियांना रस्त्याच्या धोक्यातून वाचवले, स्वखर्चाने खराब रस्त्यांची केली दुरुस्ती. ; विशाल परब यांच्याकडून चतुर्थीची आरोग्यमय भेट!

वेंगुर्ला :  आरवली गावचा ग्रामपंचायत क्षेत्रात येणारा रस्ता प्रचंड खड्डेमय झाल्याने आरवली ग्रामस्थांना वाहतूक करताना धोका संभवत होता. निधीची तरतूद नसल्याने आणि गणेशचतुर्थी तोंडावर असल्याने यातून मार्ग निघावा म्हणून आरवली सरपंच मनोज कांबळी यांनी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांना मदतीसाठी निवेदन दिले. सदर रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्यामागचे गांभीर्य लक्षात घेत श्री विशाल परब यांनी तातडीने विषयाची दखल घेतली आणि अवघ्या आठवड्यातच सदरचे खड्डे बुजवण्यासाठी स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत देऊ केली. विशाल परब यांच्या कामाचा झपाटा आरवली ग्रामस्थांना सुखद धक्का देणारा ठरला. दिला शब्द पूर्ण करणारा, आणि तोही वेळेच्या अगोदर पूर्ण करणारा असा युवा नेता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाला लाभलेले वरदान आहे आणि भविष्यात या नेतृत्वाच्या पाठी कोणत्याही परिस्थितीत आम्ही राहणारच, असा निर्धार व्यक्त करत आरवली वासियांनी श्री विशाल परब यांचे कौतुक केले आहे.

ग्रामस्थांच्या जीवाची काळजी घेणारा नेता म्हणत आरवली वासीयांनी श्री. विशाल परब यांचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी आरवली सरपंच श्री समीर कांबळी, शिरोडा माजी सरपंच श्री.मनोज ऊगवेकर, शिरोडा माजी उपसरपंच मा.श्री.राहूल गावडे तसेच सर्व भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles