मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात कणकवली महाविद्यालयाला जनरल चॅम्पियनशिप!

कणकवली : मुंबई विद्यापीठांततर्गत ५८ वा युवा महोत्सव कुडाळ संत राऊळ महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला. या युवा महोत्सवात कणकवली महाविद्यालयाने ३५ कला प्रकारात सहभाग नोंदवला होता. साहित्य, ललित कला, नाट्यकला, संगीत कला आणि नृत्यकला या विविध कलाप्रकाराचे सादरीकरण करण्यात आले. यात २० विविध कलाप्रकारांत महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे.

महाविद्यालयाने सादर केलेल्या कोलाज, मातीकाम, कथाकथन हिंदी, वक्तृत्व, हिंदी एकपात्री, मराठी एकपात्री,  हिंदी, प्रहसन हिंदी, एकांकिका हिंदी, भारतीय शास्त्री नृत्य या कलाप्रकारांना प्रथम क्रमाक, भारतीय लोकनृत्य, समूहगीत यांना द्वितीय तर एकपात्री मराठीला तृतीय क्रमांक मिळाला, तर उत्तेजनार्थ वक्तृत्व मराठी, वादविवाद इंग्रजी, मिमिक्री, भारतीय सुगम गायन यांना मिळाला. या कलाप्रकारात सादरीकरण करणा-या सर्व कलाप्रेमी विद्यार्थांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन प्रा. डॉ राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, प्राचार्य युवराज महालिंगे यांनी अभिनंदन केले आहे.

तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्‍या दिग्दर्शकांचेही अभिनंदन केले आहे. हा युवा महोत्सव यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सीमा हडकर, जिल्हा समन्वय प्रा. डॉ. आशिष नाईक, प्रा. हरीभाऊ भिसे, प्रा. सचिन दर्पे, प्रा. संदीप तेली, प्रा. मिनाक्षी सावंत, प्रा. सुकन्या तांबे, प्रा. डॉ. गीता कुणकवणेकर, प्रा. डॉ. सुरेश हुसे, प्रा. प्रवीण कडूकर, प्रा. विजय सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. सांस्कृतिक विभागातील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सीमा हड़कर व सर्व सदस्यांचे व विद्याथ्यांचे संस्था चेअरमन प्रा. डॉ .राजश्री साळुंखे, सचिव श्री विजयकुमार वळंजू , प्राचार्य युवराज महालिंगे सर्व पदाधिकारी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles