कुडाळ : तुटलेल्या वीज तारेचा जोरदार धक्का लागून फुले काढायला गेलेल्या कुडाळ तालुक्यातील झाराप शिरोडकर वाडीतील प्रताप कुडाळकर (वय ६०) यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे.
वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा नाहक बळी गेल्याने नागरिकांमधून जोरदार रोष व्यक्त करण्यात येत आहे.



