अनंत-चतुर्दशी ! – विशेष लेख.

✍️ अनंत-चतुर्दशी ‼️
✥⊱✧⊰•☬卐☬•⊱✧⊰✥

ज्याक्षणी या शरीरात अडकणं संपेल
तो क्षणच अनंत-चतुर्दशी!

जेंव्हा अहम् आणि त्वम् एकजीव होतील तीच अनंत-चतुर्दशी!

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण
बाप्पासारखा काही दिवसांचा,
कोणी दीड, कोणी पाच
तर कोणी दहा दिवसांचा!

थोडा वेळ आहोत इथे
तर थोड जगुन घेऊया,
बाप्पा सारखे थोडे
लाडू मोदक खाऊन
घेऊया!

इथे सर्वच आहेत भक्त आणि
सगळ्यांमध्ये आहे बाप्पा,
थोडा वेळ घालवू सोबत
आणि मारु थोड्या गप्पा!

मनामनातले भेद मिटतील
मिटतील सारे वाद,
एक होईल माणूस माणूस
आणि साधेल सुसंवाद!

जातील निघुन सारेच
कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला,
ना चुकेल हा फेरा
जन्माला आलेल्या
कोणाला!

बाप्पा सारखं नाचत यायचे
आणि लळा लावून जायचे,
दहा दिवसांचे पाहूणे आपण
असे समजून जगायचे!

किंमत तुमची असेलही
तुमच्या प्रियजनांना लाख,
आठवणी ठेवतील जवळ
अन् विसर्जित करतील तुमची राख!

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण
दीड दिवस अन् दहा दिवसाचा,
हे जगणे म्हणजे एक उत्सव
हा काळ दोन घडींच्या सहवासाचा!!

✥●⊱✧⊰•☬ॐ☬•⊱✧⊰●✥

विसर्जन करा – ” रागाचे “
:
विसर्जन करा – ” द्वेषाचे “
:
विसर्जन करा – ” लोभाचे “
:
विसर्जन करा – ” मोहाचे “
:
विसर्जन करा – ” मत्सराचे “
:
विसर्जन करा – ” आळसाचे “
:
विसर्जन करा – ” चिंतेचे “
:
विसर्जन करा – ” निराशेचे “
:
विसर्जन करा – ” निष्काळजीचे “
:
विसर्जन करा – ” अतिघाइचे “
:
विसर्जन करा – ” कंटाळपणाचे “
:
विसर्जन करा – ” नकारात्मक विचारांचे “
:
विसर्जन करा – ” मान्यतेचे “
:
विसर्जन करा  – ” वाईट सवयीचे “

पहा नक्की सर्व विघ्न दूर होतील!

! गणपति बाप्पा मोरया !
🙏🙏

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles