युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडीत सुरु होतेय सिंधुदुर्ग भाजपाचे भव्य जनसंपर्क कार्यालय! ; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या भव्य उद्घाटन सोहळा!

सावंतवाडी : युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतूसावंतवाडी: भारतीय जनता पक्षाचे युवा नेते श्री. विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथील माजगाव, शिरोडा नाका, मोर डोंगरजवळ उभारण्यात आलेल्या भाजपा सिंधुदुर्ग जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्या, बुधवार दिनांक ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी एका दिमाखदार सोहळ्यात होणार आहे.

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे  यांच्या शुभहस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नागरिकांच्या सेवा सुविधांसाठी आणि पक्षीय कामकाजाला गती देण्यासाठी या जनसंपर्क कार्यालयाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सौ.श्वेताताई कोरगांवकर, जिल्हा बँक अध्यक्ष श्री.मनिष दळवी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. जिल्ह्यातील भाजपाचे सर्व जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारणी सदस्य, सर्व मंडल अध्यक्ष, सर्व मोर्चा/आघाडीचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी राहणार आहे. तसेच, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व मंडल कार्यकारणीचे सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.

युवानेते विशाल परब यांच्या या उपक्रमामुळे सावंतवाडीच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत एक नवा अध्याय सुरू होत आहे, यात शंका नाही.
स्थळ: माजगाव, शिरोडा नाका, मोर डोंगरे जवळ, सावंतवाडी.
वेळ: ४ वाजता
दिनांक: बुधवारी ०५-११-२०२५

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles