Sunday, May 18, 2025

Buy now

spot_img

‘मसिआ’च्या मुंबई येथील कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी बेदमुथा उद्योग समूहाकडून तब्बल ५१ लाखांची देणगी.!

सावंतवाडी : व्यापार व उद्योग या क्षेत्रात शिखर संस्था म्हणून गेली तब्बल ९७ वर्षाहून जास्त काळ कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेने फोर्ट मुंबई येथील संस्थेच्या कार्यालयाचे नुतनीकरण व आधुनिकीकरण करण्याचे काम हाती घेतलेले असून काम लवकरच पुर्णत्वास जाणार आहे. या इमारतीत उद्योगातील नवनवीन आव्हाने आणि त्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी विचारात घेऊन मसिआने नव्याने कौशल्य विभाग तयार केलेला असून या विभागाच्या निर्मितीसाठी मसिआच्या स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे चेअरमन श्री विजय बेदमुथा यांनी बेदमुथा उद्योग समूहाकडून एकावन्न लाखांची देणगी जाहीर केली आहे.

मसिआच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी देणगी आहे. अशा दात्यांच्या आर्थिक पाठबळामुळे मसियाचे सुसज्ज कार्यालय लवकरच पुर्णत्वास जाणार असून मसिआचे कार्यतत्पर अध्यक्ष ललित गांधी यांनी बेदमुथा उद्योग समूहाचे संस्थापक श्री के. आर. बेदमुथा व परिवाराचे आभार मसिआच्या वतीने आभार मानले आहेत.

मसिआच्या या नवीन कौशल्य विकास विभागामुळे कोकणातील व्यापार उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या व नव उद्योजकांना याचा फायदा होणार असून यासाठी कोकण विभागाचे उपाध्यक्ष श्री. श्रीकृष्ण परब, मिडिया व पब्लिक रिलेशनचे स्टेट को चेअरमन अॅड. नकुल पार्सेकर, गव्हर्निग कौन्सिलचे सदस्य सर्वश्री श्री. अच्युत सावंतभोसले, श्री. राजन नाईक, श्री. संतोष राणे, श्री. मनोज वालावलकर, श्री. विजय केनवडेकर, श्री. मिलिंद प्रभू, श्री. शिवाजी घोगळे, श्री. नंदन वेंगुर्लेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles