साहित्य संमेलनानिमित्त सावंतवाडीत १४ डिसेंबर रोजी स्वरचित काव्यवाचन स्पर्धा रंगणार!

सावंतवाडी :  दिनांक २८ डिसेंबरला आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त जिल्हास्तरीय स्वरचित काव्यवान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी पाच उत्कृष्ट तर दोन उत्तेजनार्थ कवितांची निवड केली जाणार आहे. विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृतिचिन्ह, पुस्तक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धा १४ डिसेंबरला होत आहे.
विषय निवडीचे स्वातंत्र्य स्पर्धकाला असेल. कविता कोणत्याही प्रकारची (प्रेरणादायी, विनोदी, शैक्षणिक, सामाजिक) असू शकेल. पण ती मूळ स्वरचित असावी. कविता सादरीकरणासाठी योग्य असावी. प्रत्येक स्पर्धकाने स्पर्धेपूर्वी कविती लिखित प्रत संयोजकांकडे सादर करावी. एका स्पर्धकाला केवळ एक कविता सादर करता येईल. पहिल्या पाच कवितांना प्रत्येकी १ हजार रुपयांचे बक्षीस, तर उत्तेजनार्थ दोन कवितांना ५०० रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय स्मृतिचिन्ह, पुस्तक आणि प्रमाणपत्र जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रत्येक जिह्यात जिल्हास्तरीय साहित्य संमेलन घेण्यात येत आहेत. सिंधुदुर्गात याचे आयोजन श्रीराम वाचन मंदिर करत आहे. या संमेलनानिमित्त ही जिल्हास्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धा १४ डिसेंबरला होत आहे. अधिक माहिती व सहभागासाठी महेंद्र सावंत ९८६०१५०५७२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संमेलन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles