धुळे : शहराच्या नजिक असलेल्या बिलाडी रस्त्यावर धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बिलाडी खदान येथे गणरायाच्या विसर्जनाला गेलेल्या पाच ते सहा मुले पाण्यात बुडत असतानाची माहिती बंदोबस्तात असलेले पीएसआय श्री. तळेकर व पोलीस कॉन्स्टेबल श्री. थोरात यांना मिळाली. दरम्यान तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांनी पाण्यात बुडत असलेल्या चार मुलांना सुखरूप वाचविण्यात यश मिळविले.
मात्र गणपती बाप्पाला विसर्जन देण्यास गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. चैतन्य सुनील पाटील आणि लोकेश सुनील पाटील असे मृत्यू पावलेल्या दोन्ही भावंडांची नावे असून या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.