सावंतवाडीत २१-० करून दाखवा! : ॲड. निता सावंत-कविटकर यांचं मतदारांना आवाहन.

सावंतवाडी: सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदासाठी मी उभी आहे. २० उमेदवार माझ्यासोबत आहे. त्यामुळे २१-० आपल्याला करायचं आहे. प्रभाग ७ मध्ये संजू परब यांना घेरण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्यामागे आपल्याला उभं राहायच आहे. इथे सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतात. माझ्या विरोधात उभ्या असलेल्या व्यक्ती यापूर्वी तुमच्या घरी आलेल्या का ? सावंतवाडी ही राजघराण्याची होती. येथील जमीनी संस्थानच्या असल्याचा दावा कोर्टात आहे. या जमीनीची ताबा मिळावा, नुकसानभरपाई मिळावी म्हणून याचिका आहे. त्यामुळे सावंतवाडी सुरक्षीत ठेवायची असेल तर याचा विचारा व्हावा, आमिषांना बळी पडू नका असे आवाहन त्यांनीॲड. निता सावंत-कविटकर यांनी केले.

प्रभाग ७ मध्ये संजू परब व स्नेहा नाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी आ. दीपक् केसरकर, आ. निलेश राणे, जिल्हाप्रमुख संजू परब यांसह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles