‘त्यांना’ मला पाडायचं आहे पण माझी सुज्ञ जनता मला पडू देणार नाही! ; संजू परबांचा ठाम विश्वास.

सावंतवाडी : माझ्या प्रिय सावंतवाडीकर मतदार बांधवांनो, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, दोन तारीखनंतर तुमच्यासोबत रात्री अपरात्री संजू परब असणार, बाकी कुणी नसणार आहेत. मी सत्य आणि परखड बोलतो म्हणून विरोधकांना मला पाडायचं आहे,पण माझी सुज्ञ जनता मला पाडणार नाही. ते आता काहीही करतील पण मत मात्र मला घालतील, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला.

 

पैशाच्या विरोधातील ही लढाई आहे. कामाला मत द्या, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाप्रमुख तथा उमेदवार संजू परब यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, याच प्रभागात लहानाचा मोठा झालो. पुढे जाणाऱ्याला रोखायचे, अस्तित्व नष्ट करण्यासाठी मला पराभूत करायचं आहे. पैसे वाटून संपवायचा डाव आहे. पण, ही लोक माझ्यासोबत आहेत. मी नगराध्यक्ष म्हणून दोन वर्ष काम केल. राजघराण्यातील व्यक्ती नगराध्यक्ष झाल्यास मोती तलाव हातातून कशावरून जाणार नाही ? मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा विषय आहे. गाडे वाल्यांकडून भाडी वसूल केली जातात. बाजारपेठील नाथ पै सभागृहासमोरील दुकानदारांना नोटीसा गेलेल्या आहेत. तुमच्या समस्या आमच्याकडे बिनधास्त बोलू शकता. इथला समोरचा उमेदवार पैशाचा जीवावर मला तळ्यात विसर्जन करायची वल्गना करतो. मी कोरोनातही काम केलं. लोकांची सेवा देखील करतोय. आता भाषण करणारे तेव्हा कुणीही नव्हते. नगराध्यक्ष असताना विकासकामांचे ठराव घेतले. त्यामुळे पैशाला मत देऊ नका, कामाला मत द्या, माणूसकीला जागा असे आवाहन केलं.

यावेळी भाजपचे माजी नगरसेवक गुरूनाथ मठकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, संपर्क प्रमुख राजेश मोरे, आनंद शिरवलकर, महिला जिल्हाप्रमुख तथा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. निता कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, भारती मोरे, सौ. संजना परब, उमाकांत वारंग, अनारोजीन लोबो, दिपाली सावंत, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, अजय गोंदावळे, देव्या सूर्याजी, सुरेंद्र बांदेकर, उत्कर्षा सासोलकर, गोविंद वाडकर, वैभव म्हापसेकर, परिक्षीत मांजरेकर, बंड्या कोरगावकर, स्नेहा नाईक, हर्षा जाधव, बासित पडवेकर, संजना पेडणेकर, प्रसाद नाईक, वेदिका सावंत, पुजा आरवारी आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles