माजी नगरसेवक गुरुनाथ मठकर यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश! ; आ. निलेश राणे, आ. दीपक केसरकरांनी केलं स्वागत.

सावंतवाडी : शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक गुरुनाथ मठकर यांनी आज प्रभाग क्रमांक सातमध्ये शिंदे शिवसेनेकडून नगरसेवक पदासाठीचे उमेदवार सच्चिदानंद उर्फ संजू परब व स्नेहा नाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेदरम्यान शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांचे शिंदे शिवसेनेत स्वागत केले.

दरम्यान गेले काही दिवस गुरुनाथ मठकर हे भारतीय जनता पार्टीपासून अलिप्त झाले होते. ते नेमक्या कोणत्या पक्षात जातात?, याकडे सावंतवाडीकरांचे लक्ष लागून होते, आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून श्री. मठकर यांनी शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles