श्री देव पाटेकरांच्या आशीर्वादाने युवराज्ञी श्रद्धाराजे भोसलेंचा विजय निश्चित! : सावंतवाडीत हमखास ‘कमळ’ फुलणार!

–  प्रचंड कार्यकर्त्यांसह माजी उपनगराध्यक्षांचा भाजपात प्रवेश! 

– असंख्य कार्यकर्त्यांसह माजी उपनगराध्यक्षांचा भाजपात प्रवेश, सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपाचा विजय निश्चित!

सावंतवाडी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा आपली विजयी पताका देशभरात पोहचवत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,  राज्यात व कोकणात खासदार नारायण राणे व पालक मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात नगरपरिषदा व नगरपंचायतींवर भाजपाचे कमळ फुलवण्यासाठी सज्ज झाले आहेत. सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपाला घवघवीत यश मिळवून देण्याची जबाबदारी भाजपाने युवा नेते विशाल परब व सौ. वेदिका परब यांच्यावर भाजपाने सोपवली त्या क्षणापासून अहोरात्र प्रचार यंत्रणा राबवताना दिग्गजांसह असंख्य राजकिय कार्यकर्त्यांना भाजपात आणण्याचा सपाटा लावला आहे.


सावंतवाडीतील वैश्यवाडा येथील माजी उपनराध्यक्ष महेश सुपी, प्रभाग क्रमांक तीन मधील माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी आपले प्रमुख कार्यकर्ते माजी उपनराध्यक्ष महेश सुकी, माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या सर्वांचा सत्कार भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब, सौ. वेदिका  विशाल परब, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्रद्धा लखमराजे भोसले, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, प्रदेश सदस्या सौ. संध्या तेरसे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री. लखमराजे भोसले, जिल्हा कार्यकारणी सदस्य यांच्या हस्ते व सौ. शर्वणी गावकर, उमेदवार आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर, उदय नाईक, मनोज नाईक, मा. जि. प. अध्यक्ष सौ. श्वेता सावंत, मा. सभापती सौ. मानसी धुरी, रंगनाथ गवस, रवि मडगावकर, अमेय पे, बाळू सावंत, पप्पू कदम, संतोष गावडे आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles