– कर्तव्य तेजस बांदिवडेकर आणि कबीर महेश पेडणेकर (दोन्ही इ. ८ वी) प्रतिकृतीमध्ये तालुक्यात प्रथम!
– वक्तृत्वमध्ये रेश्मा पालव तालुक्यात अव्वल तर प्रश्नमंजुषामध्ये जान्हवी पाटील व कु. आर्या राणे तालुक्यात प्रथम!
सावंतवाडी: देशातील तंत्रज्ञानामध्ये नविन उपक्रमांची भर व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा व विज्ञानाविषयी आवड निर्मिती व्हावी या हेतूने प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था) नागपूर यांच्या वतीने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि पंचायत समिती सावंतवाडी यांच्या मार्फत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५-२६ चे आयोजन संस्कार नॅशनल स्कूल निरवडे , ता. सावंतवाडी येथे करण्यात आले होते.
या प्रदर्शनात सावंतवाडी तालुक्यातील शाळांनी सहभाग घेतला होता. राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज तर्फे चलप्रतिकृतीमध्ये प्राथमिक स्तरातून आरोग्य व स्वच्छता या विषयावर ‘स्वयंचलित स्वच्छ स्वच्छतागृह’ ही चलप्रतिकृती प्रकल्प कर्तव्य तेजस बांदिवडेकर आणि कबीर महेश पेडणेकर इ.08 वी_यांनी सादर केला होता. या चलप्रतिकृतीने सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला.
तसेच वक्तृत्व स्पर्धेत कु. रेश्मा संदेश पालव हिनेसुद्धा प्रभावी वक्तृत्व सादरीकरण करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला.
याबरोबर प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रकारात कु. जान्हवी विश्वास पाटील (९ वी) आणि कु. आर्या सुदेश राणे (११ वी) यांच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला.
अशाप्रकारे प्रशालेला प्रथम मानंकाचे तिहेरी यश मिळवून दिले. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे.
या यशस्वितेसाठी व RPD प्रशालेला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी , पालक व मार्गदर्शक शिक्षक – वक्तृत्व : श्रीम. महाश्वेता कुबल , प्रश्नमंजुषा : श्री. वनवे पवन , श्रीम. पी. पी. सावंत , श्रीम. एस. एस. शिरोडकर तसेच प्रतिकृती निर्मिती मार्गदर्शक श्री. डी.आर.शृंगारे या सर्वांचे
शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री. विक्रांत विकासभाई सावंत , उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर , सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष श्री. अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच
मुख्याध्यापक श्रीम. संप्रवी कशाळीकर , उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक , पर्यवेक्षक श्री. एन.जी.मुठे तसेच पालक , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी , पालक- शिक्षकसंघ यांनी अभिनंदन केले व जिल्हा स्तरासाठी शुभेच्छा दिल्या.



