….अन्यथा तीव्र आंदोलन करू! : ‘त्या’ रस्त्याबाबत सुदन कवठणकरांचा ‘PWD’ला स्पष्ट इशारा!

सातार्डा : वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारा केलेला सातार्डा ते कवठणी मुख्य रस्ता अत्यंत निकृष्ट असल्यामुळे काही दिवसातचं हा रस्ता उखडला गेलाय. त्यामुळे पुढील आठ दिवसात हा रस्ता चांगल्या पद्धतीने दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा सज्जड इशारा शिवसेना ओबीसी व व्हीजेएनटी विभागाचे जिल्हाप्रमुख तथा समाजिक कार्यकर्ते सुदन कवठणकर यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

आपल्या निवेदनात श्री. कवठणकर म्हणतात की, गाव मौजे कवठणी येथील कवठणी रस्त्यावर संरक्षक भिंतीसाठी सन २०२२-२३ च्या बजेटमध्ये सुमारे २.५ कोटीची मंजूरी होती. सन २०२४-२५ मध्ये सदरचा काम करणेत आले. गेल्या वर्षी मी फोन/व्हॉटसअॅप वरुन आपणांस कळविले होते की, सदर संरक्षक भिंतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. संरक्षक भिंतीला पाईप टाकून मोरीचे बांधकाम करणेत आले, तसेच बाजूला टाकलेले बोल्डर्स अजूनही तेथेच टाकलेले आहे. त्यामुळे सदर ठिकाणी अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? त्यामुळे सदरचे काम येत्या आठ दिवसात सदर ठेकेदाराला घेऊन पूर्णपणे न केल्यास, पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. तरी सदरचे काम येत्या आठ दिवसात तुम्ही मार्गी लावावे.

सातार्डा ते कवठणी मुख्य रस्ता सुमारे १ कि.मी. डांबरीकरण सन २०२४-२५ मध्ये करण्यात आले, मात्र साईडपट्टीचे काम आजतागायत झालेले नाही. तरी सदरचे काम येत्या आठ दिवसात पूर्ण करावे.

दरम्यान सदर ठिकाणी अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपलीच राहील. येत्या आठ दिवसात सदरचे काम पूर्ण न केल्यास आम्हाला पुढील आंदोलन छेडावे लागेल, याची नोंद घ्याव, असे सुदन (सुधा) सोनू कवठणकर जिल्हा प्रमुख, शिवसेना ओबीसी व्हीजेएनटी यांनी कळविले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles