तब्बल ४० लाखांच्या दारूचे मोठे घबाड जप्त! ; इन्सुली एक्साईजची मोठी कारवाई!

बांदा : नाताळ आणि सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा दारू वाहतूकी विरोधात मोठी कारवाई केली आहे. इन्सुली तपासणी नाक्यावर एका कंटेनरमधून छुप्या पद्धतीने नेली जाणारी 40 लाख 66 हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची अवैध विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

​राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास इन्सुली तपासणी नाक्यासमोर सापळा रचला होता. गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर (क्रमांक GJ-17-XX-0871) तपासणीसाठी थांबवण्यात आला. या कंटेनरची झडती घेतली असता, आतमध्ये १३ मोठ्या लाकडी पेट्यांमध्ये ६५० बॉक्स लपवल्याचे आढळले.

​या बॉक्समध्ये ‘रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की’च्या १८० मिलीच्या एकूण ३१,२०० सीलबंद प्लास्टिक बाटल्या आढळून आल्या.

​या कारवाईत एकूण ४० लाख ५६ हजार रुपये किंमतीची दारू व अंदाजे १० लाख रुपये किंमतीचा कंटेनर व 10 हजार रुपये किंमतीचा ​अँड्रॉइड मोबाईल असा ​एकूण ५० लाख ६६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दारू वाहतूक प्रकरणी यज्ञेशकुमार राजेंद्रकुमार शुक्ला (वय ५०, रा. वडोदरा, गुजरात) याला ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त पी. पी. सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये निरीक्षक मिलिंद गरुड, दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, जवान रणजित शिंदे, दिपक वायदंडे, सागर सुर्यवंशी, अभिषेक खत्री आणि सतिश चौगुले यांचा सहभाग होता. पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles