ख्रिसमस प्रेम अन् मानवतेचा संदेश देणारा सण! : भाजपा युवा नेते विशाल परब. ; नाताळनिमित्त दिल्या ख्रिस्ती बांधवांना मनस्वी शुभेच्छा!

सावंतवाडी : ” सिंधुदुर्ग जिल्हा हा नेहमीच सामाजिक सलोखा जपण्यासाठी ओळखला जातो. ख्रिसमसचा सण हा केवळ एका धर्माचा नसून तो प्रेम आणि मानवतेचा संदेश देणारा सण आहे.”, असे मत भाजपा युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले. 

येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव अर्थात ‘नाताळ’ संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या सणाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा नेते विशालजी परब व भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी आज वेंगुर्ला आणि सावंतवाडी येथील विविध चर्चला तसेच ख्रिस्ती बांधवांच्या घरी भेटी देऊन ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या भेटीमुळे स्थानिक ख्रिस्ती बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी विशाल परब यांचे ठिकठिकाणी स्वागत केले गेले. राजकीय भेटीगाठींच्या पलीकडे जाऊन, विशालजींनी प्रत्यक्ष घरी जाऊन ख्रिस्ती बांधवांशी साधलेला हा सुसंवाद जिल्ह्याच्या सामाजिक एकोप्याचे एक उत्तम उदाहरण ठरला आहे.

याप्रसंगी भाजपचे अनेक पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles