सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया! : भाजपा युवा नेते विशाल परब यांची प्रांजळ भावना ! ; श्री देव गावडेश्वर चरणी झाले लीन!, १४ व्या वर्धापनदिनानिमित्त ग्रामस्थांशी आपुलकीयुक्त संवाद!

वेंगुर्ला : ”सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया: ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दु:खभाग्भवेत् ।।
न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम् ।
कामये दुखतप्तानां प्राणिनामार्तिनाशनम् ।।”

‘आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वजण आनंदी राहोत आणि सर्वजण निरोगी राहोत. सर्वांचे कल्याण होवो आणि कोणीही दुःखी होऊ नये. मला राज्य, स्वर्ग किंवा पुनर्जन्म नको आहे. मी तुम्हाला दुःखी असलेल्या प्राण्यांच्या दुःखापासून मुक्ती मिळावी, अशी इच्छा करतो.”, अशी मनस्वी प्रार्थना भाजपा युवा नेते विशाल परब यांनी श्री देव गावडेश्वर चरणी व्यक्त केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे युवा नेते महाराष्ट्र राज्य विशाल परब यांनी आज श्री देव गावडेश्वर मंदिराच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त मंदिरात उपस्थित राहून देवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गावडेश्वर चरणी नतमस्तक होऊन जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडे घातले. दर्शनानंतर त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधला आणि त्यांच्या समस्या व गावांमधील विकासकामांबाबत चर्चा केली.

यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles