मोठी बातमी ! – ठाकरे शिवसेनेची ताकद वाढली, बडा नेता लागला गळाला! ; झाला थेट पक्षप्रवेश.

मुंबई : ज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अनेक नेते बैठका घेऊन रणनीती आखत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईत मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच आता मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. एका माजी नगरसेवकाने उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मशाल हाती घेतली आहे. यामुळे आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

हा नेता कोण?

मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम येथील माजी नगरसेवक चंगेज मुलतानी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार हारुन खान, वर्सोवा विधानसभा समन्वयक बाळा आंबेरकर तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

जोगेश्वरी पश्चिम भागात उद्धव ठाकरेंची ताकद वाढली –

चंगेज मुलतानी यांच्या पक्षप्रवेशामुळे जोगेश्वरी पश्चिम भागात ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. 2017 च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 62 मधून मुलतानी यांनी अपक्ष विजय मिळवला होता. त्यांनी शिवसेनेच्या राजू श्रीपाद पेडेनेकर यांचा पराभव केला होता. मात्र आता त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे बळ वाढले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles