“मैं सागर हूँ, लौटकर आऊँगा.,!” – दृढतेचा आणि पुनर्जन्माचा रूपक!, ‘तो’ केवळ आला नाही तर ‘छा गया!” – रूपेश पाटील यांचा विशेष संपादकीय लेख.

वाचक मित्रहो!,
काल दिनांक २९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात ‘हॅलो सिंधुदुर्ग’ डिजिटल न्यूज चॅॅनेलचे संपादक सागर चव्हाण यांना यावर्षीचा ‘उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात डिजिटल पत्रकारितेची मुहूर्तमेढ करणाऱ्या सागर चव्हाण या प्रचंड बुलंद आत्मविश्वास असणाऱ्या आमच्या जिवलग स्नेही मित्राचं पहिल्याप्रथम आमच्या सत्यार्थच्या संपूर्ण टीमकडून आणि तमाम पत्रकार बांधवांकडून हृदयपूर्वक अभिनंदन!

मानवी जीवनात पराभव, हरवलेपण, एकाकीपणा या सगळ्यांच्या छाया वारंवार दाटून येतात. पण त्या प्रत्येक अंधाराच्या काठाशी एक आशेचा किरण लपलेला असतो. तेव्हा कवी म्हणतो- “मैं सागर हूँ, लौटकर आऊँगा…!”, तेव्हा तो केवळ स्वतःची घोषणा करत नाही; तो संपूर्ण मानवी आत्म्याच्या जिद्दीला आवाज देतो. अशीच काहीशी तंतोतंत जुळणारी जीवन शैली सागर चव्हाण यांची देखील राहिली आहे.


ज्यांच्या नावातचं सागर अर्थातच गहिरेपण, अनंतता आणि सहनशीलतेचे प्रतीक आहे असा व्यक्ती म्हणजे सागर!, जो कधीच स्थिर नसतो. तो कधी रागावतो, गर्जतो, तर कधी शांत, गूढ आणि अंतर्मुख असतो. सागर दत्ताराम चव्हाण! म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारा, आपल्यावर आलेल्या प्रत्येक संकट लिया पेलणारा, वेळप्रसंगी शब्द दिला तर शब्दाला जागणारा मग कुणाशीही भिडायचं असेल तरी न डगमगणारा, कोणत्याही संकटात विरोधात चार हात करणारा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याच्या बाजूने उभा राहिला त्याचा विजय साकारणारा विश्वासाचा आणि मैत्रीला जागणारा एक जिंदादिल इन्सान! ज्याचा संघर्षही खोल आहे, पण त्याची क्षमता त्याहूनही खोल.

सागर मागे हटतो, भरती-ओहोटीचा खेळ तो स्वीकारतो.
पण तो कायमचा नाहीसा होत नाही, तो पुन्हा परततो.
ही परतफेड म्हणजेच नवी सुरुवात.
“लौटकर आऊँगा” म्हणत, हार मानण्यास तयार नाही, पराभवाला उत्तर देतो नव्या संकल्पनांतून आणि पुन्हा म्हणतो – “कदाचित मी काही काळ थांबलो असेल पण अजून मी संपलेलो नाही अन् संपणार देखील नाही.
मला दूर जावं लागेल, पण मी परत येईन.
आज शांत आहे, पण माझ्यातील शक्ती अजून जिवंत आहे.
येथे परत येणे म्हणजे सागर चव्हाण यांची पुनर्प्राप्ती नव्हे, ते स्वत्व, स्वप्न, आणि आत्मविश्वासाचा पुनर्जन्म आहे. संघर्षातून उगवणारी प्रकाशरेषा तो अनुभवतोय!
प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात कधीतरी ओहोटी अनुभवतो.
नाती, करिअर, प्रतिष्ठा, आरोग्य काही ना काही हातातून निसटते.
पण सागर सांगतोय – “जीवनाची भरती पुन्हा येते, फक्त थोडी वाट पाहावी लागते.
हा संदेश प्रेरकही आहे आणि अत्यंत मानवीही.!
जसं निसर्गात काहीही कायमचे थांबत नाही.
लाटा मोडतात, पुन्हा तयार होतात. रात्रीच्या मागे पहाट येते. कोरड्या जमिनीवरही कधीतरी पाऊस बरसतो.
म्हणूनच, सागर हा केवळ पाण्याचा विस्तार नसून तो अपरिमित धैर्याचा स्रोत आहे.

💥 जिद्द, आशा आणि विश्वास – सागर चव्हाण यांचा प्रवास!
“मैं सागर हूँ, लौटकर आऊँगा” प्रमाणेचं संपादक सागर चव्हाण यांचा आतापर्यंतचा प्रवास शौर्य, धीर, आणि आत्मविश्वास एकवटलेला दिसतो.
“तू मला थांबवू शकत नाहीस.!,
मी पुन्हा उभा राहीन.!’, कारण माझ्या नावातचं सागरासारखी ताकद आहे.!”, हा प्रचंड बुलंद आत्मविश्वास घेऊन पुन्हा एक नवीन आशा, विश्वास आणि काहीतरी करण्याची उर्मी घेऊन पत्रकारिता क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेणारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रांमध्ये डिजिटल पत्रकारिता आणणारा हा युवा बांधव आज खऱ्या अर्थाने अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत बनला आहे, हे नक्की!

✍️ सत्य, संवेदनशीलता आणि धैर्य! –

संपादक सागर चव्हाण यांच्या पत्रकारितेची वाटचाल नेहमी सत्याला व्यासपीठ देणारी, सत्तेला प्रश्न विचारणारी आणि समाजातील दुर्लक्षितांना आवाज देणारी पत्रकारिता राहिली आहे. त्यांची पत्रकारिता ही केवळ व्यावसायिक धुरा नसून सार्वजनिक जीवनाची जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाण ठेवत दोन दशकांचा प्रवास पार करणारे नाव म्हणजे सागर दत्ताराम चव्हाण.
सिंधुदुर्ग जिल्हापत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या कार्याचा सन्मान झाला आणि त्यासोबतच, जबाबदार पत्रकारितेची पुनः एकदा अधोरेखित झालेली भूमिकाही समोर आली.

माणसांच्या वेदनांना शब्द देणारी लेखणी –
सागर चव्हाण यांच्या पत्रकारितेची सुरुवात कॉलेज विश्वातून झाली. दैनिक तरुण भारतच्या कॉलेज विश्वाच्या पुरवणीमध्ये लेखन केले.  २००४–०६ मध्ये दै. रत्नागिरी टाइम्समध्ये सावंतवाडी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती. २००६–०७ मध्ये लोकमतमध्ये सावंतवाडी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती. पुढे मुख्य प्रवाहातील माध्यमांत काम करताना सागर चव्हाण यांनी बातमीच्या पुढे जाऊन परिणाम घडवणारे वृत्तांकन केले. आंबेगाव येथील चिमुरडी निकिता राजन पाटील हिची वेदना समाजासमोर आणताना त्यांनी केवळ बातमी दिली नाही तर लोकांना संवेदनशील केले. “केरळीयन राज”चा पोलखोल करत भूमिहीन शेतकऱ्यांच्या न्यायाचे दार उघडले. हे सारे दाखवून देते की पत्रकारितेचा उद्देश ‘हिट्स’ नव्हे तर ‘हक्क’ असतात.

लोकमतकडून क्राईम रिपोर्टर म्हणून नियुक्ती. अनेक अवैध धंद्याचा पोलखोल. पर्यावरण विषयावर विस्तृत वृत्तमालिका. अशा अनेक विषयांवर विस्तृत लिखाण सागर चव्हाण यांनी केले आहे. २०१३ मध्ये डिजिटल मीडियाचे पहिले पर्व सुरू केले. कोकणातील पहिले ‘सिंधुदुर्ग LIVE’ न्यूज अर्थात आताच. कोकणसाद LIVE पोर्टल सुरू केले. २०१४ मध्ये कोकणातील पहिल्या सिंधुदुर्ग LIVE अर्थात आताच कोकणसाद LIVE यूट्यूब चॅनेलची निर्मिती. २०१५ मध्ये कोकणातील पहिले २४x७ सिंधुदुर्ग LIVE अर्थात आताच कोकणसाद LIVE ही स्थानिक वृत्तवाहिनीची निर्मिती. 2025 मध्ये हॅलो सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल निर्मिती आस त्यांचा विलक्षण प्रवास राहिलाय.

डिजिटल माध्यम — संधी, पण जबाबदारीही!
डिजिटल युगात माहिती झपाट्याने पसरते, परंतु त्याच वेगाने अफवाही पसरतात. या पार्श्वभूमीवर सागर चव्हाण यांनी तयार केलेली डिजिटल माध्यमांची मालिका – सिंधुदुर्ग LIVE, कोकणसाद LIVE, स्थानिक 24×7 वृत्तवाहिनी, आणि आता नव्याने सुरू केलेले ‘हॅलो सिंधुदुर्ग’. यातून त्यांनी सिद्ध केले की तंत्रज्ञान म्हणजे लोकशाहीचा विस्तार, जेव्हा ते सत्यनिष्ठ हेतूने वापरले जाते.

💥समाजाशी नेहमी घट्ट नाळ!
“सिटी ऑन सायकल”, “तुमचं व्हिजन — आमचं मिशन”, कोरोना काळातील मदतकार्य, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलावंतांसाठी उपलब्ध करून दिलेले डिजिटल व्यासपीठ, ‘लोककलांचे जतन’ हे सर्व उपक्रम पत्रकारितेच्या चौकटीबाहेर जाऊन समाजाशी जोडलेली हृदयाची तळमळ दाखवतात.
पत्रकार जेव्हा माणुसकीसोबत उभा राहतो, तेव्हा तो फक्त निरीक्षक राहत नाही तर तो बदलाचा दूत बनतो.

💥 सागर चव्हाण यांना प्राप्त सन्मानांचा अर्थ –
नेल्सन मंडेला पुरस्कार असो, दादासाहेब फाळके कोविड योद्धा सन्मान असो किंवा ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ हे केवळ ट्रॉफी नसून, सार्वजनिक विश्वासाची शिक्कामोर्तब आहेत. मात्र सागर चव्हाण यांचा संदेश स्पष्ट आहे- “पुरस्कार अंतिम उद्दिष्ट नाहीत, ते पुढे अधिक जबाबदारीने काम करण्याची आठवण आहेत.”

“नष्टो मोहा स्मृतीर्लब्धा, करिष्ये वचनं तव!”

गीतेच्या १८ व्या अध्यायातील या ओळींचा संदर्भ आज सागर चव्हाण यांनच्या जीवनाशी जोडणारा आहे. कारण जसं महाभारताच्या रणभूमीवर उभा ठाकलेला अर्जुन. समोर आप्तेष्ट, गुरू, नातेवाईक आणि हातात धनुष्य. युद्ध जिंकायचे की नात्यांना वाचवायचे?, या द्वंद्वात तो हादरलेला. मन गोंधळलेले, विचार अस्थिर, आणि ध्येय धूसर. याच वेळी श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेचे अमृतज्ञान देतात.
जीवन, कर्तव्य, आत्मा, कर्म, भक्ती या सगळ्यांवर त्या रणांगणावर संवाद घडतो. आणि शेवटी अर्जुन म्हणतो—
“नष्टो मोहा स्मृतीर्लब्धा, करिष्ये वचनं तव”
आता माझा मोह नष्ट झाला, मी खरी स्मृती अर्थात म्हणजे विवेक पुन्हा मिळवली आहे. आता मी तुमच्या सांगण्यानुसारच आचरण करीन. इथे मोह म्हणजे फक्त प्रेम नाही, तो आहे अहंकार, आसक्ती, भीती आणि गोंधळ यांचा गुंता.
“लोकं काय म्हणतील?”
“माझं काय होईल?”
“योग्य ते करायला मन नाही म्हणत!”
हेच ते मोहाचे जाळे.
जसं अर्जुन त्या जाळ्यात अडकतो आणि कृष्ण त्याला स्वतःकडे परत नेतो. तसंचं काहीसं सागर चव्हाण यांच्याही जीवनात वादळे आलीत. महाभारतात कृष्णाला सावरणारा अर्जुन होता फक्त इथे सागर यांना सावरायला एक ‘अर्जुन’ आजही आहे, हे आम्ही अभिमानाने अनुभवत आहोत. जसं महाभारतातील अर्जुनाला स्वकीयांसोबत लढावं लागलं तसंच सागर चव्हाण यांनाही!

आज डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात अनेक संकटांना तोंड देऊन सागर परतलाय आणि नुसता परत आलाय एवढेच नव्हे तर मैदान गाजवण्यासाठी पुन्हा सज्ज झालाय!, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही, असे मला वाटते.

✍️आजच्या पत्रकारितेसाठी धडा –
फेक न्यूज, ट्रोल संस्कृती आणि सनसनाटीकरणाच्या स्पर्धेत पत्रकारितेची विश्वसनीयता आव्हानासमोर उभी आहे. अशा वेळी सागर चव्हाण यांचा प्रवास सांगतो – “सत्यासमोर कोणतीही सत्ता मोठी नसते. वंचितांचा आवाज थांबू न देणे हीच सेवा आणि पत्रकारिता ही शेवटी लोकशाहीची ऑक्सिजनलाईन आहे.
सिंधुदुर्गच्या भूमीतून उगवलेला हा आवाज देशभरच्या पत्रकारितेला नवी दिशा देत राहो!,
सत्य, संवेदनशीलता आणि धैर्य या तिन्ही मूल्यांना न्याय देत राहो!,
हीच आजच्या संपादकीयची अभिव्यक्ती आणि आशा.!
सागर चव्हाण यांचे पुनश्च एकदा हृदयपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस मनस्वी शुभेच्छा!
धन्यवाद!!!
✍️रूपेश पाटील.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles