आयटीआय सशक्तीकरणाच्या दिशेने गोव्याचे ठोस पाऊल! ; गोवा आयटीआय कर्मचारी संघटनेचा महाराष्ट्र– गुजरात अभ्यास दौरा!

पणजी : गोवा सरकारचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तथा कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री यांच्या मान्यतेने तसेच गोवारा ज्याच्या कौशल्य विकास व तांत्रिक शिक्षण विभागाचे संचालक श्री. विनायक कांबळी यांनी दिलेल्या प्रशासकीय मान्यतेनंतर गोवा सरकार आयटीआय कर्मचारी संघटना (GGITIEA) व United Federation of ITI Employees Association of India (UFITIEA) यांच्या संयुक्त बॅनरखाली नुकताचम हाराष्ट्र व गुजरात राज्यातील आयटीआय संस्थांचा अभ्यास दौरा यशस्वीपणे पार पाडला.

हा दौरा GGITIEA चे अध्यक्ष तसेच United Federation of ITI Employees Association of India
(UFITIEA) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. अनिल एच. भोसले यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. या दौऱ्यात युनायटेड फेडरेशन ऑफ आयटीआय एम्प्लॉईज असोसिएशन ऑफ इंडियाचे सल्लागार मंडळ अध्यक्ष श्री भोजराज काले तसेच माजी सल्लागार मंडळ अध्यक्ष श्री दानिश मेहता यांचे अमूल्य असे मार्गदर्शन लाभले.

या अभ्यास दौऱ्यात मुंबई येथील शासकीय आयटीआय, मुलुंड तसेच गुजरातमधील वडोदरा (तारसाली), गोधरा आणि अहमदाबाद येथील कुबेरनगर आयटीआयला भेट देण्यात आली.
या दोऱ्यात संघटनेचे सिद्धेश आसोलकर भूपेश दळवी व अन्य 11 जण उपस्थित होते.

या अभ्यास दौऱ्यातून गोव्यातील आयटीआय व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण दिशा
व प्रेरणा मिळाली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles