Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडीची सुज्ञ जनता सर्व जाणते, तेलींनी विरोधापलीकडे कोणत्याही विकास कामात हातभार लावलेला नाही. ; युवा सेनेकडून राजन तेलींच्या टीकेचा खरपूस समाचार.

सावंतवाडी : गेली पंधरा वर्षे दीपक केसरकर आमदार ते मंत्रीपद असा प्रवास करत असताना आपण वारंवार सावंतवाडी मतदारसंघात येऊन विरोधापलीकडे कोणत्याही विकास कामात हातभार लावलेला नाही. सावंतवाडीची सुज्ञ जनता हे जाणून आहे. त्यामुळे आपणास वारंवार पराभवास सामोरे जावे लागले आहे. मंत्री केसरकर यांच्याकडून पैसे, जमीन भूखंड लाटणे यांसारख्या कोणत्याही प्रकार मधून जनतेची फसवणूक केली नाही, असा पलटवार युवा सेना तालुकाप्रमुखांनी केला. माजी आमदार राजन तेली यांच्या केसरकरांवरी टीकेला सावंतवाडी तालुकाप्रमुख प्रतिक बांदेकर, दोडामार्ग तालुकाप्रमुख भगवान गवस, वेंगुर्ला तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे यांनी कडक शब्दांत प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले.

ते म्हणाले, आडाळी एमआयडीसी भविष्याकडे वाटचाल करत असताना त्याला हातभार लावायचा सोडून विरोधाला विरोध केला‌. त्यामुळे जवतेने विरोध करणाऱ्यांकडून विकासाची अपेक्षा सोडून दिलेली आहे. सरपंचांनी दिलेल्या निवेदनावरून भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षातील वरिष्ठांकडून प्रयत्न सुरू झालेले दिसत आहेत. या संदर्भात सतत पाठपुरावा शिक्षण मंत्री दीपक केसरकर करत आहेत. तसे प्रयत्नही त्यांनी चालू ठेवलेले आहेत. स्वतः भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेते केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनीही याची पाहणी केली आहे. चुकीची माहिती लोकांसमोर आणून लोकांची दिशाभूल करताना राजन तेली स्वतःच्या पक्षातीलच वरिष्ठांची मेहनत फुकट घालवत आहेत याचा विचार त्यांनी करावा, असा सल्ला दिला आहे.

फाईव्ह स्टार हॉटेल सारखे प्रकल्प सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न करत असताना आपण त्या ठिकाणी कोणते ना कोणते कारण घेऊन विरोध करण्यास उभे राहिलात. जनतेला विश्वासात घेण्याचे काम सोडून जनतेची दिशाभूल करण्याचे काम व विकासात अडथळा आणण्याचे काम आपण गेली दहा वर्षे चालू ठेवलंल आहे. टीका करण्याअगोदर वेंगुर्ला तसेच सावंतवाडी मतदारसंघाचा भौगोलिक आर्थिक नैसर्गिक अभ्यास करावा. स्कुबा डायव्हिंग साठी लागणाऱ्या भौगोलिक परिस्थितीची माहिती घेऊन आपण त्या संदर्भात बोलावे. शिवाय वेंगुर्ला शहरात गेल्या काही वर्षात झालेल्या विकास कामांमुळे वाढलेल्या पर्यटकांची संख्या लक्षात घ्यावी. यासंदर्भात वेंगुर्ल्यातील मतदारच आपल्याला सांगतिल. मल्टीस्पेशालिटीचा प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्न चालू आहेत. त्या संदर्भात यशही आलेले आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांचेवर जनतेचा विश्वास आहे. ते नक्कीच हे प्रश्न मार्गी लावतील. जर्मनी मध्ये नोकरी देणे हा राज्य सरकारचा जर्मन सरकारशी असलेला करार आहे. या समितीवर दीपक केसरकर असल्यामुळे याचा लाभ जास्तीत जास्त आपल्या मतदारसंघातील युवकांना व्हावा असे प्रयत्न ते करत आहेत. युवकांना जर्मनीत पाठवायची कोणती वेळ आलेली नसून ही युतीसरकारने उपलब्ध करून दिलेली परदेशात नोकरी करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी संधी आहे. इच्छुक युवक या योजनेचा लाभ उठवत आहेत. त्यामुळे वारंवार युवकांचे मानसिक खच्चीकरण करण्याची आणि रोजगारासाठी होत असलेले प्रयत्न यामध्ये अडथळा निर्माण करण्याची काही गरज नाही. की राजन तेली हे सरकारच्या या योजनेच्या विरोधात आहे ? हे त्यांनी जाहीर करावं असं आव्हान दिले. तर युनिव्हर्सिटी, कुलगुरू यांसारखे उच्च शैक्षणिक क्षेत्रातील शब्द वापरण्यापेक्षा आपण प्राथमिक शिक्षण घेऊन सावंतवाडी मतदार संघाचा भौगोलिक अभ्यास करावा, असा टोलाही तेलीना हाणला. दीपक केसरकर यांच्यावर तेलीनी केलेल्या टीकेचा युवा सेनेकडून खरपूस समाचार घेतला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles