Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

शिक्षण मंत्री केसरकर यांचे दातृत्व.!, कारिवडेच्या काळकाई मंदिरात स्वखर्चाने उभारले पत्र्याचे शेड ; देवस्थान कमिटीने मानले मंत्री केसरकर यांचे आभार.

सावंतवाडी : तालुक्यातील कारिवडेचे ग्रामदैवत असलेल्या श्रीदेवी काळकाई मंदिरच्या सभा मंडपाच्या चपरावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वखर्चाने पत्र्याचे शेड उभारून दिली आहे. त्यामुळे सभा मंडपाच्या गर्दीचा प्रश्न मार्गी लागला असून मंत्री दीपक केसरकर यांचे देवस्थान समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.

साधारण दोन महिन्यांपूर्वी काळकाई मंदिराच्या कळसाच्या गळती आणि सुशोभीकरणासह भक्तांच्या सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे मागणी काळकाई देवस्थान उपसमितीच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली होती. त्यावेळी लवकरच आपण सर्व प्रश्न मार्गी लावू, असा शब्द मंत्री केसरकर यांनी दिला होता. तो शब्द त्यांनी पाळला असून मंत्री केसरकर यांनी स्वखर्चातून या मंदिराच्या सभा मंडपावर पत्र्याचे शेड उभारले आहे.

मंत्री केसरकर यांच्या या दातृत्वामुळे त्यांचे श्री देवी काळकाई देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष बाबाजी गावकर, सचिव दत्ताराम गावडे, खजिनदार शुभम गावकर, सदस्य मनोहर वासकर, आलबा घाडी, लाडू जाधव, शंकर मेस्त्री, अनिल नाईक, कृष्णा ह. परब, शरद परब, कृष्णा बा. परब, विलास गवळी, रवींद्र ठाकूर, शंभा खडपकर, सोनू सावंत, कानवडे शिवसेना उपविभाग प्रमुख रवी परब यांच्या उपस्थितीत सदर कार्य पूर्ण करण्यात आले. मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत 30 सप्टेंबर रोजी या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असून रविवारी देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री केसरकर यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles