सावंतवाडीशी माझे ऋणानुबंध!, विकासासाठी योग्य सहकार्य करणार! : वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप यांची भावना. ; विवेकानंद गृहनिर्माण सहकारी संस्थेमार्फत नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा सत्कार सोहळा संपन्न.

सावंतवाडी : माझी जन्मभूमी जारी वेंगुर्ला असली तरी खऱ्या अर्थाने माझी कर्मभूमी ही सावंतवाडीच आहे. सावंतवाडीमध्ये मी अनेक वर्ष राहिलेलो आहे. त्यामुळे माझे ऋणानुबंध हे सावंतवाडीशी अनेक वर्षाचे आहेत. म्हणूनच वेंगुर्ल्याइतकेच प्रेम माझं सावंतवाडी शहरावरही आहे. सावंतवाडीतील गल्ली गल्लीचा मला अभ्यास आहे आणि याच भावनेतून विकास प्रक्रियेत आम्ही सोबत राहून हे ऋणानुबंध अधिक प्रतिबिंबित करण्याचा निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन वेंगुर्ल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी दिले. सावंतवाडी येथील विवेकानंद गृहनिर्माण सहकारी संस्थेमार्फत नवनिर्वाचित वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे  भोंसले, नगरपालिकेचे नगरसेवक सर्वश्री अजय गोंदावळे, नीलम नाईक, विना जाधव, ॲड. अनिल निरवडेकर यांचा सत्कार शनिवारी विवेकानंद सोसायटीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या सत्कारात श्री. गिरप बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा ममता मोहन जाधव होत्या. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक अजय गोंदावळे, नीलम नाईक, माजी नगरसेवक विलास जाधव, प्रा. डॉ. गणेश मर्गज आदि उपस्थित होते.

प्रारंभी मोहन जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात श्री. गिरप हे जरी वेंगुर्लाचे नगराध्यक्ष असले तरीही ते आमच्या सोसायटीचे सदस्य असल्याने सोसायटीचे एक सदस्य नगराध्यक्षपदी विराजमान होतात. याचा आनंद सर्वच सोसायटीधारकांना असल्याने हा सत्कार श्री. गिरप यांच्यासह सावंतवाडी नगराध्यक्ष आणि दोन्ही वार्ड नगरसेवकांचा हा सत्कार आम्ही करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या अध्यक्ष ममता जाधव यांच्या हस्ते तर नीलम नाईक यांचा सचिव श्री व सौ. मांजरेकर उभयतांच्या हस्ते अजय गोंदावळे यांचा चंद्रकांत चव्हाण उभयतांच्या हस्ते तर विलास जाधव यांचा नंदकिशोर कोंडये यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. गणेश मर्गज यांनी कार्यक्रमांस शुभेच्छा दिल्या.

यावेळी सत्काराबाबत नगरसेवक अजय गोंदावळे, नीलम नाईक, विलास जाधव यांनीही कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ममता जाधव यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक यांचे अभिनंदन केले. तसेच नगरपालिकेच्या कारभारात स्वच्छ व पारदर्शक कारभार करण्याबरोबरच सुंदर नगरपालिका ठेवण्याचे आपल्या प्रयत्नाचे अभिनंदन करतानाच प्रवेशद्वारावर होणाऱ्या दुर्गंधीकडेही त्यांचे लक्ष वेधले. तसेच शहराची सुंदरता टिकवताना या गोष्टीकडेही नगरपालिकेने लक्ष द्यावे, असे आवाहन केले. शेवटी श्रीराम माळवदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सौ ममता जाधव यांनी सुश्राव्य स्वरात स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केल्याने मान्यवरांनी त्याचं अभिनंदन केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles