कोकणची सांस्कृतिक, धार्मिक परंपरा घराघरांत पोहोचणार! : भाजपा युवा नेते विशाल परब. ; यशस्वी युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते ‘आदिनारायण दिनदर्शिके’चे दिमाखात प्रकाशन!

सावंतवाडी : निसर्गाने भरभरून वरदान दिलेल्या आपल्या कोकणची सांस्कृतिक, धार्मिक परंपरा घराघरांत पोहोचणार आहे, ती सुद्धा अगदी सर्वसामान्य वाचकांपर्यंत!, कारण आपल्या हाती आदिनारायण दिनदर्शिका आता येणार आहे.  त्यामुळे आपली दैनंदिनी नक्कीच सुखकर होणार, असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे युवा नेते व यशस्वी उद्योजक विशाल परब यांनी व्यक्त केला.

कोकणची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिक वारसा जपणारी ‘आदिनारायण दिनदर्शिका’ २०२६ चे नुकतेच भव्य प्रकाशन करण्यात आले. भाजपचे डॅशिंग युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

आदिनारायण दिनदर्शिका ही केवळ तारखांचे साधन नसून ती कोकणच्या लोककला, सण-उत्सव आणि धार्मिक विधींची माहिती देणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज मानली जाते. कोकणातील प्रत्येक घरातील भिंतीवर या दिनदर्शिकेला मानाचे स्थान मिळावे, या उद्देशाने तिची निर्मिती करण्यात आली आहे.

या प्रकाशन सोहळ्याला अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे विशालजी परब यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles