सावंतवाडी : तालुक्यातील मडूरा तिठा येथून सातोसे – सातार्डा रस्ता क्रमांक ६३ ग्रामीण मार्गाच्या रस्त्याच्या बाजूला महावितरणाने ११ हजार हॉल्टेजची विद्युत वाहिन्या व पोल मडूरा येथून सातार्डा या दिशेने जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूने घातल्या आहेत. विद्युत वाहिन्या ओढून काम पूर्ण केले होते. आणि सातार्डा दिशेने काम पुढे चालू होते. सदर रस्त्याच्या डाव्या बाजूने गॅरेज मालक प्रितेश गवंडे यांचा विरोध असताना गॅरेजच्या व वॉशिंग सेंटरच्या वरून दिनांक ११/११/२०२५ लाईन घातली गेली. या विरोधात माहिती अधिकार पदाधिकारी तथा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी सुशील चौगुले यांनी वारंवार आवाज उठवून प्रशासनाला निवेदन देखील सादर केली होती.

दरम्यान श्री. चौगुले यांच्या यांच्या लढ्याला यश मिळाले असून सामान्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी सदर पोल हटविण्याबाबत सहाय्यक अभियंता वीज वितरण यांना आदेश दिला आहे.
आपल्या आदेश पत्रात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता म्हणतात की, मडूरा – सातोसे – सातार्डा कवठणी – किनळे रस्ता प्रजिमा ६३ हा रस्ता देखभाल दुरुस्तीसाठी या उपविभागाच्या अखत्यारीत येतो. सदरील रस्त्यावर कि. मी २०० ते कि मी २/०० (देऊळवाडी माऊली मंदिर परिसर) या लांबी मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी बांदा यांनी विनापरवाना खोदकाम रस्त्याच्या ROW (मार्गाधिकार) मध्ये कलेमुळे रस्त्याची साईड पट्टी खराब झाली असून सदर ठिकाणी नव्याने बसविण्यात आलेले वीज खांब रस्ता वाहतुकीला धोकादायक झाले आहेत. नियोजित रस्ता रुंदीकरण/देखभाल दुरुस्ती बाबबीत सदर वीज खांब अडचणी उदभवू शकतात. रस्ते हे प्रामुख्याने वाहतुकीसाठी असतात त्यामुळे वाहतुकीतील अडथळे दूर करणे हे या विभागाचे काम असल्याने वाहतुकीला अडथळा असलेले विसखांब दूर करणे अत्यंत आवश्यक आहे.
सदर ठिकाणची भौगोलिक स्थिति लोकवस्ती, व्यावसायिक रहदारीची असल्याने भविष्यात जर काही समस्या (उदा सुरक्षिततेचा चिता, नियमांचे पालन न करणे, भविष्यातील रस्त्यांच्या योजनांशी संघर्ष) आढळल्यास त्यास आपण सर्वस्वी जबाबदार रहाल याची कृपया नोंद घ्यावी.
तरी कोणतीही पूर्वकल्पना न देता रस्त्याच्या साईडपट्टीवर वीज खांब बसविण्याकरिता परस्पर स्त्याची खुदाई केल्यामुळे शासकीय मालमतेचे (साईड पट्टी) नुकसान झाले आहे. तसेच सदर क्षेत्र हे अपचाल प्रवण क्षेत्र तयार झाले आहे. याबाबत स्थानिक लोकांमधूनही हरकती या विभागाकडे प्राप्त झाल्या असून ही बाव अत्यंत खेदजनक आहे. तरी आपण तात्काळ ROW (मार्गाधिकार) मधील वीज खांब दूर करून साईड पट्टी पुनस्र्थापिल करून शासकीय मालमत्तेची नुकसान भरपाई करून मिळावी.



